शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘बाईक टॅक्सी’बाबत कायदा करण्याचा सरकारचा विचार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:45 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने काही दिवसांअगोदर ‘बाईक टॅक्सी’ला परवानगी नाकारली होती. यासंदर्भात कायदा नसल्याने ही अडचण झाली होती. मात्र आता केंद्र सरकार याबाबत कायदाच करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे रस्त्यांवर ‘बाईक टॅक्सी’देखील धावताना दिसणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत नागपुरात माहिती दिली.

ठळक मुद्देविजेवर चालणाऱ्या वाहनांना ‘परमिट’ची आवश्यकता राहणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने काही दिवसांअगोदर ‘बाईक टॅक्सी’ला परवानगी नाकारली होती. यासंदर्भात कायदा नसल्याने ही अडचण झाली होती. मात्र आता केंद्र सरकार याबाबत कायदाच करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे रस्त्यांवर ‘बाईक टॅक्सी’देखील धावताना दिसणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत नागपुरात माहिती दिली.प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी यांनी या विषयावर भाष्य केले. देशात चारचाकी ‘टॅक्सी’ची सेवा लोकप्रिय झाली आहे. मात्र मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे इंधन आणि वेळेची बचत व्हावी यासाठी ‘बाईक टॅक्सी’चा पर्याय उपयुक्त ठरु शकतो. सोबतच तरुणांना रोजगाराचे एक नवे साधनदेखील उपलब्ध होईल. यासंदर्भात कायदा करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे, असे गडकरी यांनी सांगितले.पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर निश्चितच चिंताजनक आहे व सामान्य मनुष्यांवर भार वाढतो आहे. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. देशात सद्यस्थितीला ७० टक्के ‘पेट्रोलियम’ उत्पादन आयात करण्यात येते. इंधनाचा पुरवठा करणारे देश अनेकदा पेट्रोलचे उत्पादन घटवतात. त्यामुळे दर वाढलेले दिसून येतात. त्यामुळेच जैवइंधनाचा उपयोग करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. विजेवर तसेच जैवइंधनावर चालणाºया वाहनांना ‘परमिट’ची आवश्यकता राहणार नाही. जैवइंधनांचा अधिकाधिक वापर करण्यावर केंद्र सरकार भर देणार आहे. पुढील ४ ते ५ वर्षात याचे परिणाम समोर येतील, असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीTaxiटॅक्सी