शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

संविधानानुसार काम करणारे सरकारच आमचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 02:41 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अनुसूचित जाती उपयोजनांचे कोट्यवधी रुपये मिळाले नाही. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने हा विषय लावून धरला होता.

ठळक मुद्देई. झेड. खोब्रागडे : महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमतर्फे शिष्यवृत्ती परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अनुसूचित जाती उपयोजनांचे कोट्यवधी रुपये मिळाले नाही. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने हा विषय लावून धरला होता. आज भाजपा सत्तेवर आहे, पण आजही तेच सुरू आहे. शेड्युल कास्ट सबप्लॅनचे १५ हजार कोटी मिळालेच नाहीत. त्यामुळे केवळ नावासाठी नव्हे तर जे सरकार खºया अर्थाने संविधानानुसार आणि फुले-शाहू आंबेडकरांच्या विचारानुसार काम करेल, तेच सरकार आमचे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी येथे केले.महाराष्ट्र आॅफिसर्स फोरम नागपूर जिल्ह्याच्यावतीने शनिवारी उर्वेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिष्यवृत्ती परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विशेष मार्गदर्शन आणि भूमिका विशद करताना ते बोलत होते. याप्रसंगी समाजकल्याण विभागाचे माजी आयुक्त संजीव गाडे, जयराम खोब्रागडे, भाऊ दायदार, सुरेंद्र पवार, राजेश पांडे, शिवदास वासे प्रामुख्याने उपस्थित होते.ई. झेड. खोब्रागडे म्हणाले, अनुसूचित जातींसाठी अनेक योजना आहेत. संविधानात त्यांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु या योजना प्रामाणिकपणे पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर गांभीर्याने काम होत नसल्याचे दिसून येते. तेव्हा आपण केवळ भावनिक विषयावर तीव्र होण्यापेक्षा विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा सरकारवर दडपण आणावे. याप्रसंगी शिष्यवृत्ती, जात वैधता प्रमाणपत्र आणि वसतिगृहातील सुविधा यावर सखोल चर्चा करण्यात आली. संबंधित विषयातील अधिकारी व तज्ज्ञांनी यावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांचे निराकरणही केले. प्रा. महेंद्र मेश्राम यांनी संचालन व प्रास्ताविक केले.लोकमतचे कौतुकसामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या वसतिगृहांतील सुविधांवर प्रकाश टाकणारी ‘वसतिगृहांचे वास्तव’ ही वृत्तमालिका लोकमतने चालवली होती. ई.झेड. खोब्रागडे यांनी या वृत्त मालिकेचा आवर्जून उल्लेख केला. यात वसतिगृहातील असुविधांसह चांगल्या बाबींचाही उल्लेख करण्यात आल्याने खºया अर्थाने वस्तुस्थिती दर्शविल्याचे ते म्हणाले.