शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री समाधान शिबिरामुळे शासन जनतेपर्यंत पोहोचणार

By admin | Updated: August 10, 2016 02:21 IST

शहरातील झोननिहाय मुख्यमंत्री समाधान शिबिराला मंगळवारी सुरुवात झाली आहे. शहरातील जनतेने आपल्या समस्या सोडविण्यासाठी

चंद्रशेखर बावनकुळे : समाधान शिबिराला लक्ष्मीनगरपासून सुरुवात नागपूर : शहरातील झोननिहाय मुख्यमंत्री समाधान शिबिराला मंगळवारी सुरुवात झाली आहे. शहरातील जनतेने आपल्या समस्या सोडविण्यासाठी या शिबिरांचा लाभ घ्यावा. शिबिरामध्ये शासनाचे सर्व विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे जनतेच्या समस्या त्वरित सुटण्यास मदत होणार असून शासन जनतेपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व झोनमध्ये मुख्यमंत्री समाधान शिबिर, आपले शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर झोनमधील विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या परिसरात आयोजित शिबिराचे मंगळवारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, महापालिकेच्या जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रा. राजीव हडप, भाजपच्या दक्षिण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भोयर , नगरसेविका नीलिमा बावणे, उषा निशितकर, जयश्री वाडीभस्मे, सचिन कारळकर, आशिष पाठक, श्रीपाद बोरीकर, विमलकुमार श्रीवास्तव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. १२ आॅगस्टपर्यंत हे शिबिर नागरिकांसाठी सुरू राहणार आहे. या शिबिरात शासकीय दरामध्ये शपथपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र, वय, अधिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, मतदार यादीतील नावाची दुरुस्ती करणे, नाव वगळणे, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना, श्रावणबाळ योजना, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, नवीन शिधापत्रिका, विवाह प्रमाणपत्र, जन्म -मृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद, प्रमाणपत्र, वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, आधार कार्ड बनविणे, आधार कार्ड सुधारणा, आधार कार्डचे स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड महापालिकेसंबंधी असलेल्या समस्यांचे समाधान या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या शिबिरात विविध योजनांचा लाभ एका छताखाली जलद गतीने मिळणार आहे. योजनेस आवश्यक असलेली कागदपत्रे आवश्यकतेनुसार या शिबिरातून नागरिकांनी प्राप्त करावी. या तीन दिवसांच्या शिबिरात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग ५५-आरपीटीएस, प्रभाग ५६-साई मंदिर, प्रभाग ६८- नरेंद्रनगर, प्रभाग ६९-खामला, प्रभाग ७०- गोपालनगर, प्रभाग ७१- टाकळी सिम, प्रभाग ७२- जयताळा या प्रभागातील नागरिकांना लाभ घेता येईल.(प्रतिनिधी)