शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मतदारांसाठी सरकारी वाहनांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:35 IST

लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान १०० टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगातर्फे उपाययोजनांचे निर्देश रॅम्प, व्हीलचेअरसह असेल सुविधा

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान १०० टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि घरी पोहोचविण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्थाही प्रत्येक मतदान केंद्रांवर राहील, हे विशेष.नागपूर जिल्ह्यात एकूण सात हजार दिव्यांग मतदार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. परंतु हा आकडा कितीतरी मोठा आहे. त्यामुळे दिव्यांग मतदार निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे प्रयत्न केले जात आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण ४,३८२ मतदान केंद्रे आहेत. मतदानाची टककेवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोग मतदार जनजागृत अभियान राबवीत असते. आता अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर इत्यादी दिव्यांग मतदारांचेही १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहे. जसे प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प व व्हीलचेअरची सुविधा असेल. गेल्या वर्षी ही सुविधा काही मतदान केंद्रांवर होती. परंतु यंदा ती प्रत्येक ठिकाणी राहावी, असा प्रयत्न आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी त्यांना त्यांच्या घरून मतदान केंद्रावर आणण्यासाठी शासकीय वाहनही उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित मतदान केंद्रातील अधिकाऱ्याकडे तशी मागणी करावी लागेल. प्रत्येक मतदान केंद्रात शासकीय वाहन असते. ते दिवसभर केंद्रावरच असते. त्या वाहनाचाच वापर केला जाईल. मागणी केली असता शासकीय कर्मचारी स्वत: वाहन घेऊन संबंधित दिव्यांग मतदाराच्या घरी जातील आणि त्याला मतदान केंद्रावर घेऊन येतील. तसेच मतदान झाल्यावर त्याला घरी पोहोचवून देतील.

विशेष कमिटी स्थापनदिव्यांगांचे मतदान वाढविण्यासाठी विशेष कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये शासकीय अधिकाऱ्यासह दिव्यांगांसाठी काम करणाºया विविध सदस्यांचा समावेश आहे. ही कमिटी दिव्यांगांमध्ये मतदानासाठी जागृती करण्याचे काम करेल. यासाठी नागपूर शहराच्या मध्यभागी लवकरच दिव्यांगांसाठी एक मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

खास दिव्यांगांसाठी अ‍ॅपनिवडणूक आयोगाने खास दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी (पर्सन विथ डिसअ‍ॅबिलिटी) अ‍ॅप तयार केले आहे. य अ‍ॅपद्वारे अपंग व्यक्तीने त्याचा इपीक नंबर (मतदान ओळखपत्र क्रमांक) टाकला तर त्याची थेट अपंग मतदार म्हणून नोंदणी होईल. अशाप्रकारे अपंग मतदार निश्चित झाल्यास प्रत्येक मतदान केंद्रात अपंगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प आणि वाहनासह इतर सुविधा उपलब्ध करण्यास सोपे जाणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार