शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजना नागरी बँकांच्या माध्यमातून राबवाव्यात : सतीश मराठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 20:37 IST

सहकारी बँकांची चळवळ संक्रमण अवस्थेतून जात आहे. यासोबत सहकारी बँकांचे खासगीकरण, बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमध्ये सुधारणा आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांना रोड रॅप देणार आहे. शासकीय योजना नागरी बँकांच्या माध्यमातून राबवाव्यात आणि ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेला पूर्ण अधिकार मिळणे आवश्यक असल्याचे मत सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी नागरिक सहकारी बँकेच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देठेवीदारांच्या सुरक्षेसाठी नियम महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहकारी बँकांची चळवळ संक्रमण अवस्थेतून जात आहे. यासोबत सहकारी बँकांचे खासगीकरण, बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमध्ये सुधारणा आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांना रोड रॅप देणार आहे. शासकीय योजना नागरी बँकांच्या माध्यमातून राबवाव्यात आणि ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेला पूर्ण अधिकार मिळणे आवश्यक असल्याचे मत सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी नागरिक सहकारी बँकेच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.रिझर्व्ह बँकेला खासगी बँकांच्या मर्जिंगचे अधिकारखासगी क्षेत्रातील बँकांवर नियंत्रण असणारे अधिकार रिझर्व्ह बँकेला असावेत. खासगी बँकेचा सीईओ आणि एमडी तसेच संचालक चांगला वागला नाही तर बदलल्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. पण नागरी बँकांवर सहकार विभाग आणि रिझर्व्ह बँक अशी दुहेरी अधिकार आहेत. जर रिझर्व्ह बँकेला पूर्ण अधिकार दिल्यास नागरी बँकांवर नियंत्रण राहील आणि बेकायदेशीर व्यवहार होणार नाहीत. शिवाय रिझर्व्ह बँकेला खासगी बँकांचे विलिनीकरण करण्याचेही अधिकार आहेत. ते नागरी बँकांच्या बाबतीत नाहीत. देशातील बँकिंग सेवा क्षेत्रात रिझर्व्ह बँक ढवळाढवळ करीत नसल्याचे मराठे यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रात नागरी बँका सक्षमभारताची अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकाची आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला जी २० देशांमध्ये स्थान आहे. नागरी बँकांची स्थिती पाहिल्यास देशातील १५५० नागरी बँकांपैकी ५२५ बँका महाराष्ट्रात आहेत. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सहकार चळवळ सक्षम आहे. त्यातुलनेत अमेरिकेत ८५०० को-ऑपरेटिव्ह बँका असून, १० कोटी नागरिक सहकार चळवळीशी जोडली गेली आहेत. फ्रान्समध्ये चार हजार सहकारी बँका आहेत. सहकार चळवळ संपूर्ण देशात सक्षम व्हावी, असे रिझर्व्ह बँकेचे मत आहे. देशात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर बँका हव्याच. मेक इन इंडिया योजनेतही सहकारी बँकांना केंद्र सरकारने जोडावे. अम्ब्रेला ऑर्गनायझेशनला रिझर्व्ह बँकेला मंजुरी दिल्याचे मराठे यांनी सांगितले.सहकार भारतीतर्फे नागरी सहकारी बँकांचे ४ व ५ ऑगस्टला अधिवेशनसहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी बँकांचे राज्यस्तरीय अधिवेशन ४ व ५ ऑगस्टला शेगाव येथे होणार आहे. अधिवेशनात नागरी बँकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारला देण्यात येणार आहे.अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषिमंत्री अनिल बोंडे, कामगार मंत्री डॉ. संजय कुटे, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सचिव राजकुमार, सहकार आयुक्त सतीश सोनी आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी तसेच नागरी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, अधिवेशन प्रमुख सुभाष जोशी, संयोजक आशिष चौबिसा आणि समन्वयक विवेक जुगादे उपस्थित होते.

टॅग्स :InvestmentगुंतवणूकMediaमाध्यमे