शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी धान्याची होतेय काळाबाजारी : रेशन दुकानात येते निकृष्ट धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 22:21 IST

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर अन्न पुरवठा विभागाचे महत्त्व भरपूर वाढले. रेशनच्या धान्याने लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे पोट भरले. जे कार्डधारक कधी रेशनच्या दुकानात जात नव्हते, त्यांनीही कार्डवर मिळणारे रेशन घेतले. रेशनची अचानक मागणी वाढल्याने या वितरण व्यवस्थेतील दुष्परिणामही सामोर आले.

ठळक मुद्देएफसीआय, अन्न पुरवठा व कंत्राटदारांच्या संगनमताने होतोय प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर अन्न पुरवठा विभागाचे महत्त्व भरपूर वाढले. रेशनच्या धान्याने लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे पोट भरले. जे कार्डधारक कधी रेशनच्या दुकानात जात नव्हते, त्यांनीही कार्डवर मिळणारे रेशन घेतले. रेशनची अचानक मागणी वाढल्याने या वितरण व्यवस्थेतील दुष्परिणामही सामोर आले. या प्रक्रियेत असलेल्या यंत्रणेकडूनच आता सरकारी धान्याची एफसीआयच्या गोदामातूनच काळाबाजारी होत असल्याचे आरोप होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या एफसीआयच्या गोदामामधून सरकारी धान्याचे वितरण रेशन दुकानदारांना होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहर व ग्रामीण भागात रेशनचा पुरवठा करण्यासाठी गणेश कॅरिअर या एजन्सीला कंत्राट दिले आहे. या कंत्राटदाराने पुरवठ्यासाठी काही सबएजंट नेमले आहेत. यातील काही सब एजंटचे एफसीआयच्या अधिकाऱ्यासोबत संगनमत आहे. काही सब एजंटला चांगल्या प्रतीचे धान्य रेशनच्या दुकानासाठी दिले जात आहे. चांगल्या प्रतीचे हे धान्य काळाबाजारात थोड्या जास्त किंमतीत विकले जात असल्याची माहिती आहे. एफसीआयच्या गोदामात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारीही नियुक्त असतात. पण हा सर्व प्रकार संगनमताने होत असल्याचे सांगण्यात येत आहे.जुलै महिन्यात मिळाला निकृष्ट गहूजुलै महिन्यात रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा गहू मिळाला होता. यासंदर्भात एफडीओला तक्रार केली होती. त्यांनी बदली करून मिळेल, असे सांगितले. काही रेशन दुकानदारांनी वितरित केला. पण काही रेशन दुकानदारांकडे अजूनही स्टॉक आहे. त्यांना बदलून द्यायला तयार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.वखार महामंडळात होते चालबाजीवखार महामंडळातून तांदळाचा पुरवठा रेशन दुकानदारांना होतो. ५० किलोचे तांदळाचे पोते बाहेरून येतात. काटा करण्याच्या बहाण्याने पोत्याची शिलाई काढून एक ते दीड किलो तांदूळ काढण्यात येतो. पोत्यात हाताने शिलाई मारून रेशनच्या दुकानात पाठविली जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार