शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

सरकार नव्हे समाजाच्या सक्रियतेमुळे देश चालतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 02:41 IST

सरकारकडून विविध मुद्यांवर अपेक्षा करण्याचे प्रस्थ वाढले आहे. यातून सरकारला उठसूठ विचारणादेखील केली जाते.

मोहन भागवत : ‘सारथी’ संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळानागपूर : सरकारकडून विविध मुद्यांवर अपेक्षा करण्याचे प्रस्थ वाढले आहे. यातून सरकारला उठसूठ विचारणादेखील केली जाते. यामुळे जगातील लोकांना हा देश नेमका चालतो कसा असा प्रश्न पडतो. यातून विनोदही होतात. परंतु सर्वांनी लक्षात घ्यायला हवे की हा देश सरकार नव्हे तर समाजाची सक्रियता व गुणवत्तेवर चालतो, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केंद्रावर टीका करणाऱ्यांना चिमटा काढला आहे. नागपुरातील ‘सारथी’ या स्वयंसेवी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष समारंभाप्रसंगी रविवारी ते बोलत होते.सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पुण्यातील उद्योजक डी. एस. कुळकर्णी, ‘सारथी’चे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध वझलवार, संस्थापक सचिव अमर वझलवार, अध्यक्ष मधुकर आपटे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र राठी व ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक हे प्रामुख्याने उपस्थित होते. सत्ताधीशांच्या हाती अनेक मुद्यांचे केंद्रीकरण झाले आहे. परंतु देशाची लोकसंख्या लक्षात घेता केवळ राजकीय पक्ष, राजकारणी व नोकरशहा यांच्या भरवशावर देश चालू शकत नाही. इंग्रजांनी देश चालविला नव्हता, तर राज्य केले होते. तीच पद्धत आपण अनुसरतो आहोत. परंतु देश त्या तंत्रावर चालत नाही याचा आपल्याला विसर पडला आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे परोपकार व लोककल्याणाची भावना लोकांमध्ये जागृत होईल तेव्हा खरी प्रगती साधली जाईल. गेल्या काही काळापासून जनतेची सक्रियता वाढते आहे ही दिलासा देणारी बाब आहे, असे डॉ.भागवत म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन झाले. शिवाय राजन दंडिगे व हेमंत अंबादे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरुद्ध वझलवार यांनी केले. प्रभा देऊस्कर यांनी संचालन केले तर मधुकर आपटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)