शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गोरेवाडा व अंबाझरी जगाच्या नकाशावर आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 03:19 IST

गोरेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासह विविध विभागांनी एकत्र येत एकात्मिक

नागपूर : गोरेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासह विविध विभागांनी एकत्र येत एकात्मिक प्रकल्प तयार केला. आज या प्रकल्पाने गती घेतली आहे. त्याच धर्तीवर अंबाझरी तलाव व परिसराच्या विकासासाठी महापालिका, वन विभाग, पर्यटन विभाग आदी विभागांनी एकत्रित येत एकिकृत प्रकल्प तयार करावा. यातून अंबाझरीचा सर्वंकष विकास होईल. येत्या काळात गोरेवाडा व अंबाझरी ही दोन ठिकाणे जगाच्या नकाशावर आलेली दिसतील, असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वन विभागातर्फे आयोजित अंबाझरी पाणलोट विकास, मृद-जलसंधारण कामाचे भूमिपूजन तसेच जैव विविधता उद्यान विकास कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. अमरावती मार्गावर कमलानगर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर उपस्थित होत्या. आमदार समीर मेघे, यांच्यासह नगरसेवक परिणय फुके, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, वन विभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक ए.के.निगम, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन भगत, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)श्री भगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.एस.के.सिन्हा, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी.एस.रेड्डी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, अंबाझरीच्या पाणलोट क्षेत्रामधील संरक्षित वन भूमीत जैवविविधता उद्यान विकसित करण्याचे चांगले काम वन विभागाने हाती घेतले आहे. ३८ भागांमध्ये या प्रकल्पाची रचना केली असून तेवढी तळीही बांधली जाणार आहेत. विशेष म्हणजे आकाशातून पाहताना तळ्यांची रचना ‘नागपूर’ सारखी लिहिलेले दिसेल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात जलसंधारणाचे काम आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून होत आहे. अंबाझरी नागपूरचे वैभव आहे. नागनदी पुनर्जीवित करण्यासाठी अंबाझरी पाणलोट क्षेत्राचा विकास व त्याचबरोबर मृद जलसंधारण कामाचे संवर्धन आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)जल व वन संपदेचे जतन करा४आपण निसर्गाच्या सुंदर रचनेचा उपमर्द केला आहे. वैज्ञानिकदृष्ट्या एकात्मिक व्यवस्थापन करुन जलसंपदा आणि वन संपदेचे योग्य नियोजन केल्यास योग्य प्रमाणात पाऊस पडतो. यासाठी मोठ्या प्रमाणावर जलसंपदा आणि वन संपदेचे संवर्धन करा,असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.नगरसेवक फुकेंचे कौतुक४नगरसेवक परिणय फुके यांनी जैव विविधता उद्यान उभारण्याची संकल्पना मांडली होती. राज्य सरकारतर्फे या चांगल्या कल्पनेचे स्वागत करण्यात आले. या प्रकल्पासाठी फुके यांनी सतत पाठपुरावा केला. त्या संबधीचे प्रस्ताव तयार करून घेतले व आज या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुके यांच कामाच्या शैलीचे कौतुक केले. वन विभागातर्फे आयोजित अंबाझरी पाणलोट विकास, मृद-जलसंधारण काम तसेच जैव विविधता उद्यान विकास कामाचे भुमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत नगरसेवक परिणय फुके, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर व इतर.