शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! उपराजधानी झाली ‘हागणदारीमुक्त’; महापालिकेत आनंदाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 10:15 IST

केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने देशभरातील हागणदारीमुक्त १३८ शहरांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने जाहीर केली यादी

आॅनलाईन लोकमतनागपूर : केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने देशभरातील हागणदारीमुक्त १३८ शहरांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील ३८ शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया,चांदूर रेल्वे, सावनेर आदी शहरांचा समावेश आहे.राज्य सरकारच्या पथकाने जुले २०१७ मध्ये नागपूर शहराला हागणदारीमुक्त घोषित केले होते. त्यानंतर महापालिकेतर्फे शहरातील ८० ठिकाणे हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती. याची माहिती केंद्र सरकारला देऊ न पथकामार्फत नागपूर शहराचा दौरा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार २८ ते ३० डिसेंबर दरम्यान केंद्र सरकारच्या एक सदस्यीय पथकाने शहरातील १०० हून अधिक भागाचा दौरा करून पाहणी केली होती.दौऱ्यानंतर अवघ्या तीन दिवसात नागपूर शहराला हागणदारीमुक्त घोषित केल्याने महापालिका प्रशासन व सत्तापक्षात आनंदाचे वातावरण आहे.विशेष म्हणजे दोन दिवसानंतर होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणातही याचा फायदा मिळणार आहे. हागणदारी मुक्त शहराला ३५० गुण मिळतात. त्यामुळे नागपूर शहराला या वर्गात शंभर टक्के गुण मिळणार आहे. अश्विन मुद्गल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी स्वत: शहरातील विविध भागांना भेटी देऊन नागरिकांसोबत चर्चा केली.सार्वजनिक व व्यक्तिगत शौचालय बांधण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही या संदर्भात निर्देश दिले. आरोग्य विभागाच्या पथकाला सक्रिय केले. आठ महिन्यात शहरातील संबंधित ठिकाणे निश्चित केली. सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे नागपूर शहर हागणदारीमुक्त झाले.

शहरातील जनतेचे सहकार्यासाठी आभारहागणदारीमुक्त शहरात नागपूरचा समावेश झाला आहे ही आनंदाची बाब आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे आभार व्यक्त करतो. एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे हे यश मिळणे शक्य नव्हते. स्वच्छता सर्वेक्षणात याचा फायदा होणार आहे. यामुळे ३५० गुण मिळतील. शहरातील नागरिक स्वच्छतेविषयी जागरूक आहेत. कें द्रीय पथक नागपूर दौऱ्यावर येणार असल्याबाबत आॅनलाईन माहिती मिळाली होती.या पथकाने १०० हून अधिक ठिकाणांची पाहणी केली. १७०० जियोटेक फोटो काढले. नागरिकांसोबत चर्चा करतानाचे व्हिडिओ अपलोड केले होेते.- अश्विन मुद्गल, आयुक्त महापालिका१०० ठिकाणांची केली पाहणीनागपूर दौऱ्यावर आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने शहरातील १०० हून अधिक ठिकाणांची पाहणी केली. यात स्लम, निवासी, व्यावसायिक,शैक्षणिक, रेल्वे परिसर आदींचा समावेश होता. या पथकाला केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने पाठविले होते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान