शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

गोंडवाना विद्यापीठात ‘आदिवासी अध्यासन’ हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 8:49 PM

गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना होऊन आता आठ वर्षे झाली आहेत. या विद्यापीठांतर्गत २३७ महाविद्यालये येतात. या भागात गोंडी, माडिया, हलबी, कोलामी यासारख्या बोलीभाषा बोलल्या जातात. परंतु विद्यापीठात मात्र या भाषांशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम नाही. त्यामुळे या भाषांच्या संवर्धनासाठी ‘आदिवासी अध्यासन’ निर्माण करावे, अशी मागणी प्रभू राजगडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देबोलीभाषा जपण्याची विनंती : प्रभू राजगडकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना होऊन आता आठ वर्षे झाली आहेत. या विद्यापीठांतर्गत २३७ महाविद्यालये येतात. या भागात गोंडी, माडिया, हलबी, कोलामी यासारख्या बोलीभाषा बोलल्या जातात. परंतु विद्यापीठात मात्र या भाषांशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम नाही. त्यामुळे या भाषांच्या संवर्धनासाठी ‘आदिवासी अध्यासन’ निर्माण करावे, अशी मागणी प्रभू राजगडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात आदिवासी साहित्य हा विषय अभ्यासक्रमात आहे. अनेक संशोेधक प्राध्यापक आदिवासी साहित्य व यासंबंधित विषयांवर पी.एचडी. करीत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. असे आदिवासी अध्यासन निर्माण करणे का गरजेचे आहे, याची कारणेही त्यांनी या पत्रात नमूद केली आहेत. आदिवासी अध्यासन झाल्याने महाराष्ट्रातील आदिवासी बोलीभाषा व अन्य बोलीभाषा यांचा तौलानिक अभ्यास करणे सोपे होईल. आदिवासी संस्कृती आणि मानवी व्यवहार, आधुनिकता यावरील अभ्यासाला चालना मिळेल. आदिवासींमधील स्थापत्यकला, आयुर्वेद, आभूषणकला, काष्ठशिल्पशास्त्र, धातूकला यांचा उगम, विकास व आजच्या स्थितीतील त्यांची स्थिती याचेही नीट आकलन होऊ शकेल. याशिवाय आदिवासींच्या जल-जंगल-जमीनविषयक भूमिका, त्या संबंधाने झालेले कायदे याबाबत अभ्यास करता येईल. त्यामुळे शासनाने या मागणीचा अविलंब व गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी राजगडकर यांनी या पत्रात केली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठGadchiroliगडचिरोली