शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

गोंडवाना एक्स्प्रेसने तिघांना चिरडले

By admin | Updated: December 14, 2015 03:03 IST

रेल्वेलाईनवरून जाणाऱ्या तिघांना गोंडवाना एक्स्प्रेसने चिरडले. यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, एक गंभीर जखमी आहे.

दोघांचा जागीच अंत : एक गंभीर जखमीनागपूर : रेल्वेलाईनवरून जाणाऱ्या तिघांना गोंडवाना एक्स्प्रेसने चिरडले. यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, एक गंभीर जखमी आहे. रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लकडगंजमधील रेल्वेलाईनवर हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.नारायणसिंग ऊर्फ पांडूसिंग राठोड (३५, रा. झेंडाचौक, प्रेमनगर) हा एक अनोळखी व्यक्ती अशी मृतांची नावे आहेत. तर, कमलेश झुंबक जांभूळकर (वय ३०, रा. ताडसा) असे जखमीचे नाव आहे. हे तिघेही रोजच्या कामावर जाण्यासाठी रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घराबाहेर पडले. प्रेमनगरातील (लकडगंज) रेल्वेलाईनने जात असताना मागून वेगात आलेल्या गोंडवाना एक्स्प्रेसने या तिघांना चिरडले.भीषण अपघाताचा धक्कानागपूर : राठोड आणि अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. काळ बनून सुसाट वेगाने आलेल्या रेल्वेगाडीची ऐनवेळी कल्पना आल्यामुळे कमलेशने बाजूला उडी मारली. मात्र, तोपर्यंत रेल्वेने त्याच्यावर झडप घातली होती. त्यामुळे रेल्वेगाडीची जोरदार धडक बसून कमलेश बाजूला फेकला गेला. तो गंभीर जखमी झाला. दिवसाढवळ्या वस्तीच्या बाजूला अनेकांसमोर हा भीषण अपघात घडल्यामुळे अनेकजण शहारले. त्यांनी आरडाओरड करीत वस्तीतील मंडळी जमा केली. लकडगंज पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांचा ताफा अपघातस्थळी पोहचला. त्यांनी तिघांनाही मेयोत नेले. डॉक्टरांनी राठोड आणि अन्य एकाला मृत घोषित केले तर, गंभीर जखमी असलेल्या कमलेशवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणातील दुसऱ्या मृताचे नाव स्पष्ट झाले नव्हते. त्याचप्रमाणे लकडगंज पोलिसांनी गुन्हाही दाखल केला नव्हता. (प्रतिनिधी)