शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

गोंदिया मेडिकलमधील त्रुटी डिसेंबरपर्यंत दूर होणार

By admin | Updated: November 20, 2015 03:25 IST

गोंदिया येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्रुटी येत्या डिसेंबरपर्यंत दूर ...

शासनाचे प्रतिज्ञापत्र : हायकोर्टाच्या आदेशानुसार दिला कालबद्ध कार्यक्रमनागपूर : गोंदिया येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्रुटी येत्या डिसेंबरपर्यंत दूर करण्याची ग्वाही राज्य शासनाने दिली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगिळ यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याविषयी प्रतिज्ञापत्र सादर केले.२९ आॅक्टोबर २०१५ रोजी न्यायालयाने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाद्वारे काढण्यात आलेल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे शासनाला निर्देश दिले होते. या आदेशाचे पालन करून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. त्यातील माहितीनुसार, महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांची नियुक्ती झाली असून अन्य रिक्त जागांवर डिसेंबरपर्यंत नियुक्त्या करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आयटीआय वसतीगृह वापरण्याची परवानगी मिळाली आहे. सेंट्रल फोटोग्राफी सेंटर नोव्हेंबरपर्यंत तर, लेक्चर थिएटर डिसेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवासी डॉक्टर व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी १६ टूबीएचके व २४ वनबीएचके क्वार्टर वाटप केले आहेत. लेबर रुममध्ये निकषानुसार सुधारणा करण्यात येत आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.याविषयी व्यावसायिक प्रफुल्ल अग्रवाल यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यांनी शासनाच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन करून सुनावणी एक आठवडा तहकूब केली. गोंदिया मेडिकल २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ३ जानेवारी २०१३ रोजी गोंदिया येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, विविध त्रुटीमुळे महाविद्यालय सुरू होऊ शकले नाही. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अक्षय नाईक व अ‍ॅड. अमित माडिवाले, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे तर, केंद्र शासनातर्फे मुग्धा चांदुरकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)