शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया हत्याकांडात मारेकरी बाहेरचा की घरचाच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:10 IST

नागपूर - गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या चुरडीतील (ता. तिरोडा) हत्यांकाडातील मारेकरी बाहेरचा की घरचा, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित केला ...

नागपूर - गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या चुरडीतील (ता. तिरोडा) हत्यांकाडातील मारेकरी बाहेरचा की घरचा, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित केला आहे.

एकाच कुटुंबातील रेवचंद तसेच मालता बिसेन हे दाम्पत्य आणि त्यांची पौर्णिमा आणि तेजस ही दोन मुले अशा चाैघांचे मृतदेह आढळून आल्यापासून गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अवजड वस्तूने प्रहार करून मालता, पौर्णिमा आणि तेजसची हत्या करण्यात आली. तर, रेवचंद यांच्या शरीरावर एकही जखम नाही. त्यांच्या कपड्यांवर मात्र रक्ताचे शिंतोडे आहे. या हत्याकांडाचे आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला तेथे नेले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीचा छडा लावण्यासाठी आणलेले श्वान घरातच घुटमळले आणि नंतर ते रेवचंदच्या मृतदेहाकडे बघून भुंकू लागले. डॉक्टरांनी चाैघांचा पोस्टमार्टम अहवाल देताना तिघांची गंभीर दुखापतीमुळे आणि रेवचंदची गळफास लावल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला आहे. रेवचंदच्या शरीरावर कोणतीही जखम नाही. त्यामुळे आधी तिघांची हत्या करून नंतर रेवचंदने आत्महत्या केली की काय, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. घरात झटापटीच्या कोणत्याही खुणा नाहीत. लुटमारीचेही कोणते निशाण नाही. त्यामुळे या हत्या करणारा आरोपी बाहेरचा की घरचाच, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या संबंधाने आम्ही सर्वकश चाैकशी करीत आहोत. त्यामुळे या घडीला काही निष्कर्ष काढता येणार नाही, असे गोंदियातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत.

----

((बुलेट))

रेवचंद यांच्या शरीरावर जखम नाही. कपड्यांवर मात्र रक्ताचे शिंतोडे

------

प्राथमिक वैद्यकीय अहवालात रेवचंदचा गळफासामुळेच मृत्यू

------

श्वान घरातच घुटमळले, मृतदेहाकडे बघून भुंकले

------

झटापटीच्या खुणा नाहीत. लुटमारीचेही निशाण नसल्याची पोलिसांची माहिती

------