शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची तस्करी

By admin | Updated: July 5, 2014 02:08 IST

विमानतळावरून सिनेस्टाईल पाठलाग करून गुन्हेशाखेच्या पथकाने एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून ३५ लाखांचे सोने जप्त केले.

नागपूर : विमानतळावरून सिनेस्टाईल पाठलाग करून गुन्हेशाखेच्या पथकाने एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून ३५ लाखांचे सोने जप्त केले. प्रदीप वासुदेवराव बोबडे (वय ५९) असे पकडण्यात आलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. बोबडे नागपूर शहर पोलीस दलात धंतोलीचे ठाणेदार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात डीवायएसपी आणि लोहमार्ग पोलीस दलात कार्यरत होते. वर्षभरापूर्वीच ते सहायक आयुक्त (एसीपी) म्हणून निवृत्त झाले. पोलीस दलातील एक निवृत्त अधिकारी नागपूर विमानतळावरून लाखोंच्या सोन्याची खेप घेणार असल्याची माहिती गुन्हेशाखेला कळली. त्यावरून पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना, उपायुक्त सुनील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेने कारवाईसाठी सापळा रचला. विमानतळ परिसरात थेट कारवाईचे आदेश नसल्याने गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळ, सहायक निरीक्षक मंगेश देसाई आपल्या सहकाऱ्यांसह विमानतळाच्या बाहेरच्या परिसरात आज सकाळी ९ पासून दबा धरून बसले. विमानतळावरून सिनेस्टाईल पाठलागनागपूर : सकाळी १० च्या सुमारास निवृत्त एसीपी बोबडे इनोव्हा कार (एमएच ३१/ डीसी ४९९०) मधून विमानतळावरून वर्धा मार्गाकडे वेगाने जाताना दिसताच गुन्हेशाखेच्या पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. सोनेगाव परिसरात गुन्हेशाखेच्या पथकाने आपले वाहन उभे करून बोबडे यांची इनोव्हा रोखली. बोबडे यांनी आपण स्वत: ‘एसीपी होतो’, असे सांगून कारवाईच्या पवित्र्यातील पोलीस पथकाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी तेवढ्याच धिटाईने बोबडे यांची झडती घेतली. तेव्हा त्यांच्या पॅन्टच्या खिशात सोन्याची १ विट (किंमत ३१ लाख रुपये), १०० ग्रामचे बिस्कीट (३ लाख १०), ३२ ग्रामची १६ नाणी (९९ हजार २००) असे एकूण ३५ लाख ९ हजार २०० रुपयांचे सोने आढळले. त्यांच्या कारमध्ये एक ४० हजारांचा एलसीडीसुध्दा आढळला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल तसेच पळून जाण्यासाठी वापरलेली सात लाखांची इनोव्हा कार ताब्यात घेऊन बोबडेंना गुन्हेशाखेत आणले. त्यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना कोर्टात नेले. दरम्यान, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला ३५ लाखांच्या सोन्यासह ताब्यात घेतल्याची वार्ता उपराजधानीत सर्वत्र वायुवेगाने पसरली. सायंकाळी ५ वाजता पोलीस आयुक्त के. के.पाठक यांनी गुन्हेशाखेत येऊन जप्त केलेले सोने तसेच कारवाईचा सविस्तर अहवाल बघितला. बोबडे यांची तत्काळ सुटकासोने आणि इतर किमती वस्तू, अशा ४२ लाख ४९ हजाराच्या जप्त छुप्या मालाच्या प्रकरणी शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आनंद बोरकर यांच्या न्यायालयाने आरोपी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त प्रदीप बोबडे यांची तडकाफडकी सुटका केली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यास आरोपीची गरज भासल्यास समक्ष हजर होण्याच्या संदर्भात आरोपीला पूर्वसूचना द्यावी, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले. या प्रकरणाचा गवगवा होऊ नये, छायाचित्रकारांना बोबडे यांचे छायाचित्र घेता येऊ नये, यासाठी अतिशय दक्षता बाळगून गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना छुप्या मार्गाने न्यायालयात आणले. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी बोबडे यांना न्यायालयात हजर केले. बोबडे हे संशयास्पदस्थितीत किमती मालासह आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ (अ) (ड)अन्वये सोनेगाव पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे या कारवाईची कोणालाही माहिती देऊ नये, असे आदेश सोनेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी दिले होते. न्यायालयात बोबडे यांचे वकील अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर आणि अ‍ॅड. पराग उके यांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, संबंधित किमती मालाच्या संदर्भात चोरी अथवा लबाडीच्या गुन्ह्याची कोठेही नोंद नाही. त्यामुळे त्यांना अटकेत ठेवता येणार नाही. न्यायालयाने सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून बोबडे यांच्या सुटकेचा आदेश दिला. (प्रतिनिधी)