शहरं
Join us  
Trending Stories
1
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
2
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
3
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
4
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
6
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
7
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
8
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
9
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
10
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
11
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
12
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
13
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
14
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
15
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
16
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
17
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
18
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
19
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
20
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ

तांब्याच्या साखळीवर सोन्याचा मुलामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तांब्याच्या साखळीवर सोन्याचा मुलामा देऊन एका महिलेने सराफा व्यापाऱ्याला ९८ हजार रुपयांचा गंडा घातला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तांब्याच्या साखळीवर सोन्याचा मुलामा देऊन एका महिलेने सराफा व्यापाऱ्याला ९८ हजार रुपयांचा गंडा घातला. तिचा डाव साधल्याचे बघून तिची दुसरी साथीदार अशाच प्रकारे फसवणूक करायला सराफा व्यापाऱ्याकडे आली आणि सराफा व्यापार्‍याने तिला गणेशपेठ पोलिसांच्या हवाली केले. गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

अनुप अशोक उदापुरे या सराफा व्यापार्‍याने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी कॉटन मार्केटमधील त्यांच्या दुकानात बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास एक महिला आली. तिने आपले नाव खुशबू ऊर्फ ईशानी मनोज पांडे असे सांगितले. जवळची सोन्याची साखळी बदलून दुसरी नवीन घ्यायची आहे, असे तिने सराफा व्यापाऱ्याला सांगितले. उदापुरे यांनी साखळीचे वजन करून त्या बदल्यात तिला ९८ हजार, १७५ रुपये किमतीची नवीन सोनसाखळी आणि ६७५ रुपये दिले. रात्री दुकान बंद करताना त्यांनी, कथित खुशबूने दिलेल्या सोनसाखळीची तपासणी केली असता, ती सोन्याची नसून तांब्याची असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी सरिता अंगद पांडे नामक महिला उदापुरे यांच्या दुकानात आली. तिने सोन्याचा मुलामा असलेल्या बांगड्या उदापुरे यांना विकण्याचा प्रयत्न केला. यांनी त्या महिलेला कसलाही संशय येऊ न देता, गणेशपेठ पोलिसांना बोलाविले. ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी आपल्या सहकार्‍यांसह दुकानात धाव घेऊन, सरिता पांडे नामक महिलेला ताब्यात घेतले. तिला पोलीस ठाण्यात आणून तिच्या साथीदार महिलेबाबत विचारणा करण्यात आली. तिला फसवणुकीच्या आरोपात अटक करण्यात आली. तिच्या साथीदार महिलेचा शोध घेतला जात आहे.