शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

सोने २५ हजारांकडे!

By admin | Updated: July 19, 2015 03:00 IST

वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल २ हजार रुपयांची घसरण झाली असून शनिवारी २६,१५० हजारांवर स्थिरावलेले भाव पुढील सणासुदीत २५ हजारांपर्यंत खाली ...

गुंतवणुकीची संधी : तीन वर्षांत २७ टक्के घसरणमोरेश्वर मानापुरे नागपूरवर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल २ हजार रुपयांची घसरण झाली असून शनिवारी २६,१५० हजारांवर स्थिरावलेले भाव पुढील सणासुदीत २५ हजारांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तीन वर्षांत सोन्यात २७ टक्के तर वर्षभरात १२ टक्क्यांची घसरण झाली. जागतिक बाजारात सोन्याने नीचांक गाठला आहे. घरगुती बाजारातही सोने ३० टक्क्यांनी घसरले आहे. हीच खरी गुंतवणुकीची वेळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक बाजारात मागणी मंदावलीजागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत दरदिवशी दिसून येत आहे. भाव आणखी कमी होतील, या अपेक्षेने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडून फारशी मागणी नाही. सणासुदीतही घसरणीची अपेक्षा आहे. स्थानिक बाजारात आठवड्यात १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव १७५ रुपयांनी खाली उतरून भावपातळी २६,२७५ रुपयांवर स्थिरावली. सोन्याप्रमाणेच चांदीतही चांगलीच घसरण झाली आणि चार महिन्यांच्या नीचांकावर आली. जागतिक बाजारात असलेली विषम परिस्थिती आणि स्थानिक बाजारपेठेत खरेदीदार नसल्याने सोन्याच्या मागणीत घट झाल्याची प्रतिक्रिया सराफा बाजाराचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी घडामोडींचे विश्लेषण करताना सांगितले. वायदा बाजारात नफाखोरीवायदा बाजारात नफेखोरीमुळे सोन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठ बहुतांश जागतिक बाजारपेठ आणि वायदे बाजारावर अवलंबून असते. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या भावात घसरण झाली. शेअर बाजार, जागतिक घडामोडी आणि डॉलरच्या किमतीचा परिणाम देशांतर्गत सोन्याच्या बाजारावर पडत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आठवड्यातही घसरणचालू आठवड्यात सहाही दिवस सोन्यात घसरण झाली. स्थानिक सराफा बाजारात सोमवारी १० ग्रॅम शुद्ध सोने १५ रुपयांनी घसरले. मंगळवारी भाव ३५ रुपयांनी कमी होऊन २६,४०० रुपयांपर्यंत खाली आला. आंतरराष्ट्रीय घडामोडीनुसार बुधवारी सोने ६५ रुपयांनी घसरून २६,३६५ रुपयांवर पोहोचले. सोन्यात सुरू असलेली घसरण गुरुवार, १६ जुलैला सुरूच होती. यादिवशी शुद्ध सोने ६५ रुपयांनी उतरले. शुक्रवारीही २५ रुपयांनी भाव कमी होऊन २६,२७५ रुपयांत विक्री झाली. शनिवारी बाजार बंद होतेवेळी सोने १२५ रुपयांनी कमी झाले. त्यादिवशी २४ कॅरेट सोन्याचे भाव २६,१५० रुपये, २३ कॅरेट २५,९०० आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव २५,६५० रुपयांवर पोहोचले. सोने २५ हजारांपर्यंत खाली उतरण्याच्या वृत्ताने ग्राहकांनी खरेदी थांबविली आहे. सध्या खरेदी करता येईल, एवढी पातळी सोन्याने ओलांडली आहे. ग्राहकांनी पुन्हा वाट पाहू नये, असे सराफांनी सांगितले.सोन्यात गुंतवणुकीवर प्रश्नचिन्हसुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचा विचार नेहमीच केला जातो. पण गेल्या काही वर्षांत निरंतर होणारी घट गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सध्या ग्राहक सोने खरेदी आवश्यतेवेळीच करीत आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था बळकट होत असल्याने भाव आणखी कमी होऊ शकतात, असे अर्थतज्ज्ञ म्हणाले.