शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करीवरून गुलाबरावांचा खडसेंवर हल्लाबोल

By admin | Updated: December 10, 2015 03:06 IST

जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांना कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल करीत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी बुधवारी विधानसभेत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला.

सागर चौधरी, मिश्रांना पाठीशी कोण घालतो? : खडसे यांची चौकशीची घोषणानागपूर : जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांना कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल करीत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी बुधवारी विधानसभेत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला. सागर चौधरी हा जळगावमधील पोलीस निरीक्षक सादरे आत्महत्या प्रकरणात आरोपी आहे. त्याचा बचाव का केला जात आहे, त्याचे कुणाशी संबंध आहेत, अशी विचारणा पाटील यांनी राज्यात होत असलेल्या अवैध वाळू उपशासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडताना केली. वाळू माफियांमधील गुंड प्रवृत्तींमुळे लुटमार, खून, या प्रकारात वाढ होत असून वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले. जळगावमध्ये राजेश मिश्रा याच्याकडून महसूल विभागाला १५ कोटी रुपये घेणे आहेत. एवढी थकबाकी असताना त्यांना काळ्या यादीत का टाकले नाही, असा सवाल पाटील यांनी केला. एवढी थकबाकी असताना मिश्रालाच पुन:पुन्हा ठेके दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सागर चौधरीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर, महसूल मंत्री खडसे यांनी मिश्रावरील आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की कुणालाही पाठीशी घालण्याची सरकारची भूमिका नाही. नव्या कायद्यानुसार वाळू तस्करांची संपत्ती, वाहने जप्त करणे,त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईची तरतूद आहे. चौकशीत दोषी आढळलेल्यांविरुद्ध ही कारवाई केली जाईल. पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली तेव्हा सभागृहात कर्जमाफीच्या मागणीवरून गदारोळ सुरू होता. या गदारोळातच ही लक्षवेधी झाली. अवैध वाळू उपसा न होण्यासाठी सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती खडसे यांनी लेखी उत्तरात दिली. (विशेष प्रतिनिधी)