शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळपेठ बाजारातील अतिक्रमण हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:37 IST

शहरातील महत्त्वाचे चौक, प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांच्या फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. प्रवर्तन विभागाची यंत्रणा याची दखल घेत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

ठळक मुद्देअतिक्रमणाची केली पाहणी : प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील महत्त्वाचे चौक, प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांच्या फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. प्रवर्तन विभागाची यंत्रणा याची दखल घेत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधातील कारवाईला सुरुवात केली आहे. गोकुळपेठ भागातील अतिक्रमण चार दिवसात हटविले जाणार आहे.अतिक्रमण समस्येकडे प्रशासन व पदाधिकाºयांचे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकमत’ने शहरातील अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. अतिक्रमण हटविण्याचे प्रवर्तन विभागाला निर्देश दिले. त्यानुसार कारवाईला सुरुवात केली आहे. यासोबतच पदाधिकारी कामाला लागले आहेत.शनिवारी पदाधिकाºयांनी गोकुळपेठ भागातील अतिक्रमणाचा आढावा घेतला. धरमपेठ झोनच्या सभापती रूपा राय, स्थापत्य व प्रकल्प सभापती संजय बंगाले, परिवहन समिती बंटी कुकडे, नगरसेवक निशांत गांधी, सुनील हिरणवार, धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, वाहतूक पोलीस निरीक्षक (पश्चिम विभाग) जयेश भांडारकर, अतिरिक्त पोलीस निरीक्षक परमार आदींनी धरमपेठ झोनमधील अतिक्रमणाची पाहणी केली. चार दिवसात अतिक्रमण काढण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.धरमपेठ येथे वेस्ट हायकोर्ट रोडवर व्हीआयपींचे निवासस्थान आहे. तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असूनही लगतच्या भागात अतिक्रमणाची समस्या आहे. या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा, अशी मागणी पदाधिकाºयांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांच्याकडे केली आहे. बावनकुळे यांनी याला संमती दर्शविली आहे. महत्त्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असूनही गोकुळपेठ परिसरात अस्वच्छता आहे तसेच अतिक्रमणाची गंभीर समस्या आहे. चार दिवसात अतिक्रमण हटवून परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निदेंश प्रशासनाला दिले तसेच पार्किंगची समस्या मार्गी लावण्याची सूचना केली.