शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

देवांनाही चोरट्यांचे ‘विघ्न’

By admin | Updated: April 19, 2015 02:17 IST

गोरगरीब, सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच नेत्यांचे नातेवाईक अशा सर्वच स्तरातील नागरिकांना हैराण केल्यानंतर चोरट्यांनी आता देवाकडे मोर्चा वळविला आहे.

नागपूर : गोरगरीब, सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच नेत्यांचे नातेवाईक अशा सर्वच स्तरातील नागरिकांना हैराण केल्यानंतर चोरट्यांनी आता देवाकडे मोर्चा वळविला आहे. सावरकर नगरातील हनुमान मंदिराची कुलूपं फोडून चोरट्यांनी दानपेटीतून रक्कम लंपास केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली. देवनगर चौकानजिकच्या सावरकर नगरात श्री हनुमान मंदिर आहे. १९७० ला या मंदिराची स्थापना झाली. मंदिराच्या सभागृहात पहाटे योगाभ्यास वर्गही भरतो. नेहमीप्रमाणे आज सकाळी ५.४५ ला योगाभ्यासी आत्माराम हटवार मंदिराचे दार उघडण्यासाठी आले. समोरच्या चॅनल गेटचे कुलूप तुटून दिसल्यामुळे त्यांनी मंदिराच्या बाजूलाच राहाणारे भाऊराम बिजेवार यांना कळविले. त्यांनी आजूबाजूची मंडळी तसेच पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळेतच मंदिरासमोर विश्वस्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय दिवाणजी, सहसचिव प्रवीण डोळस आले. परिसरातील भाविकांनीही गर्दी केली. चोरट्यांनी चॅनल गेट तसेच मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि भिंतीच्या आतमधील बाजूला बसविलेल्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रक्कम पळविली. याबाबत धंतोली पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांचा ताफाही मंदिरात पोहचला. चोरट्यांनी दानपेटीतून किती रक्कम पळविली, ते स्पष्ट झाले नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी दानपेटी उघडण्यात आली होती. तेव्हापासून मंदिरात येणाऱ्या भाविकांनी किती रक्कम दान केली, ते सांगता येणार नसल्याचे हटवार म्हणाले. दरम्यान, या चोरीसोबतच चोरट्यांनी बाजूच्या एका लॉन्ड्रीवाल्याचे कपडे हुसकावून रोख शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे चौकातील भेळपुरीवाल्याचाही हातठेला फोडून चोरी केली. (प्रतिनिधी)