शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बकरी चोरणाऱ्यांनी एकाला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

कळमन्यातील घटना : आरोपी फरार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बकरी चोरणाऱ्या टोळीने एका व्यक्तीला चाकूने भोसकले आणि त्याच्या ...

कळमन्यातील घटना : आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बकरी चोरणाऱ्या टोळीने एका व्यक्तीला चाकूने भोसकले आणि त्याच्या जवळची बकरी हिसकावून नेली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. चंदन अरुण खैरकर (वय ४१) असे जखमीचे नाव आहे. चंदन कळमन्यातील शिवकृपा हौसिंग सोसायटीत राहतात. त्यांच्याकडे बकरी असून, ते स्वतःच त्यांना चारायला घेऊन जातात.

शनिवारी दुपारी ते हस्तिनापूर वीटभट्टीजवळ आपल्या बकऱ्यांना चारत होते. तेवढ्यात तेथे आरोपी चेतन ठाकूर, शोएब खान आणि त्यांचा एक साथीदार दुचाकीवर बसून आले. त्यांनी चंदनच्या समोर असलेल्या कळपातून एक बकरी उचलली आणि पळू लागले. चंदनने आरोपींकडे धाव घेऊन त्याचा विरोध केला. ते पाहून आरोपी शोएब खानने चाकू काढून चंदनला भोसकले आणि बकरी घेऊन पळून गेले. या हल्ल्यात चंदन जबर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मिळालेल्या माहितीवरून कळमना पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---