शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जीएम वांग्याच्या बियाण्यांची चाेरट्या मार्गाने घुसखाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:06 IST

नागपूर : जनुकीय परिवर्तीत (जीएम) बियाण्यांच्या लागवडीला सध्यातरी महाराष्ट्रात परवानगी नाही. मात्र तरीही जीएम बियाण्यांचा बेकायदेशीर वापर सर्रासपणे हाेताना ...

नागपूर : जनुकीय परिवर्तीत (जीएम) बियाण्यांच्या लागवडीला सध्यातरी महाराष्ट्रात परवानगी नाही. मात्र तरीही जीएम बियाण्यांचा बेकायदेशीर वापर सर्रासपणे हाेताना दिसत आहे. अशाच मार्गाने कापसाच्या जीएम बियाण्यांचा प्रसार केल्यानंतर आता वांग्याच्या जीएम बियाण्यांची चाेरट्या मार्गाने घुसखाेरी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या बियाण्यांमुळे भविष्यात पर्यावरणावरील संभाव्य धाेके लक्षात घेत जीएम बियाण्यांना बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्याची मागणी राज्यातील ७० पर्यावरणस्नेही संस्थांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जीएम बियाणे चाेरट्या मार्गाने शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविणाऱ्यांना पकडण्यात आले हाेते. यामध्ये मुख्यत्वे बीटी काॅटन व बीटी वांग्याची तस्करी माेठ्या प्रमाणात हाेत असल्याची माहिती आहे. काेराेना आपत्तीचा फायदा घेत बांगलादेश व इतर देशांमधून भारतात आणून महाराष्ट्रासह इतर राज्यात तस्करी केली जाते. बीजाेत्सवच्या सदस्या व वनस्पती अभ्यासक प्राची माहूरकर यांनी सांगितले, राज्यातील काही माेठे व्यापारी गट या जीएम बियाण्यांच्या प्रसारात अग्रेसर आहेत. साेशल मीडियाचा वापर करून प्रसार केला जात आहे. भरघाेस उत्पादनाचे आमिष दाखवून किंवा गावातील प्रतिष्ठित मंडळीकडून दबाव आणून शेतकऱ्यांना या बेकायदेशीर बियाण्यांची लागवड करण्यास भाग पाडले जात आहे. बियाण्यांच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसल्याने शेतकरी याला बळी पडत असल्याचे माहूरकर यांनी सांगितले. शिवाय या बियाण्यांची खरेदी करताना पावती मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन संबंधित यंत्रणांना या बेकायदेशीर तस्करीविराेधात कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी ७० संस्थांनी केली आहे.

हे बियाणे नपुंसक आणि खर्चिकही

प्राची माहूरकर यांनी सांगितले, जीएम वांग्याचे बियाणे नपुंसक असते. एकदा लागवड केल्यानंतर पुढच्या पेरणीसाठी त्या बियाण्यांचा वापर करता येत नाही. सुरुवातीला हे बियाणे शेतकऱ्यांना माेफतही दिले जाते पण एकदा सवय झाली की शेतकऱ्यांना ते खरेदी करण्याशिवाय पर्याय उरत नाही. यामुळे दरवर्षी बियाण्यांसाठी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. शिवाय वातावरणाशी अनुकूल ठरले नाही तर पुन्हा तणनाशके, खतांचा खर्च करावा लागताे. शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य बाजारावर अवलंबून हाेते.

देशात ९५० देसी वांग्यांच्या प्रजाती

आपल्या देशात ९५० च्यावर वांग्याच्या नाेंदणीकृत प्रजाती आहेत. उल्लेखनीय म्हणजे प्रत्येक हवामानानुसार हाेणाऱ्या आहेत. त्यामुळे चवीचेही वैविध्य राखले गेले आहे. जीएम बियाणे आले तर देसी बियाणे नष्ट हाेईल व चवीचे वैविध्य संपेल, अशी भीती माहूरकर यांनी व्यक्त केली.