शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या वैभव अंधारेची ‘कॉमरेड्स मॅरेथान’मध्ये चमक

By admin | Updated: June 8, 2017 02:54 IST

शहरातील प्रतिभावान धावपटू वैभव अंधारे याने द. आफ्रिकेतील कॉमरेड्स मॅरेथॉनमध्ये यशस्वी कामगिरी करीत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील प्रतिभावान धावपटू वैभव अंधारे याने द. आफ्रिकेतील कॉमरेड्स मॅरेथॉनमध्ये यशस्वी कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचा नावलौकिक उंचावला आहे. ८६.७३ किलोमीटर अंतराची ही वार्षिक मॅरेथॉन द. आफ्रिकेच्या क्वाजुलू नताळ ते दरबन आणि पीटरमेरिट्झबर्ग या शहरांदरम्यान आयोजित केली जाते. जगातील सर्वांत लांब अंतराची तसेच सर्वांत प्राचीन मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेची ख्याती आहे. नागपूरचा अ‍ॅथ्लिट तसेच रेस अ‍ॅक्रॉस अमेरिकेतील स्पर्धक डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात सराव करणारा वैभव अंधारे याने प्रो हेल्थ फाऊंडेशनच्या ‘ माईल्स अ मिलर्स’ या कार्यक्रमांतर्गत मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. वैभव हा नागपूर-१० के मॅरेथॉनसह अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होत असतो. स्थानिक आॅरेंज सिटी रनर्स सोसायटीचा तो सदस्य आहे. ४ जून रोजी आयोजित कॉमरेड्स मॅरेथॉनमध्ये जगातील अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी हजेरी लावली. नागपूरच्या चार धावपटूंचा यात समावेश होता. सर्व चारही स्पर्धक अमित थत्ते, डॉ. संजय जायस्वाल आणि राजेंद्र जायस्वाल हे डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात सराव करीत आहेत.यापैकी वैभव अंधारे हा एकमेव धावपटू शर्यत पूर्ण करण्यात यशस्वी ठरला.अन्य तिन्ही धावपटू ७९ किलोमीटरचा (फायनल कट आॅफ) पहिला टप्पा गाठण्यात दोन मिनिटांच्या फरकाने चुकले. मध्य भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चारही धावपटूंची कामगिरी या क्षेत्रातील अन्य धावपटूंना प्रोत्साहित करणारी ठरणार आहे.