शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

ंअ‍ॅम्ब्युलन्सचा गोरखधंदा

By admin | Updated: November 27, 2015 03:06 IST

‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर अ‍ॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे...

इस्पिळांमध्ये दरपत्रकच नाही : गरीब रुग्णांची लूटनागपूर : ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर अ‍ॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, मात्र शहरात याला ‘कमर्शियल’ सेवेचे स्वरूप आले आहे. गरीब आणि गरजू नागरिकांना गंभीर रुग्ण इस्पितळात घेऊन जाणे किंवा मृतदेह रुग्णालयातून घरी नेणे जिकरीचे झाले आहे. विशेष म्हणजे, अ‍ॅम्ब्युलन्स चालकांच्या या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी गेल्या वर्षी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकेचे दरपत्रक ठरवून दिले होते. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मारुती रुग्णवाहिकेच्या पहिल्या २५ कि.मी. पर्यंत ४०० रुपये दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मेडिकल, मेयोपासून ते मनपाच्या इस्पितळांसह आरोग्य विभागाच्या एकाही इस्पितळात या दरपत्रकाचे फलक लावण्यात आले नसल्याने गरीब रुग्णांची सर्रास लूट सुरू आहे. सेवेच्या नावावर सुरू करण्यात आलेला अ‍ॅम्ब्युलन्सचा धंदा शहरात इतर व्यवसायाप्रमाणेच बहरला आहे. अमर्याद कमाईमुळे अनेकजण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असणाऱ्या स्पर्धेमुळे या सेवेचे बाजारीकरण झाले आहे, परिणामी गरीब व गरजुंकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात आहे. अ‍ॅम्ब्युलन्स चालक ५० कि.मी.अंतरावरील गावात जाण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये भाडे आकारतात. काही तर अ‍ॅडव्हान्स पेमेंट घेऊन अ‍ॅम्ब्युलन्समध्ये डिझेल भरून येतो असे सांगून पसार होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या वर्षी याची दखल प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नागपूरने घेतली. कार्यालने रुग्णवाहिकेचे दरपत्रक ठरवून दिले. शहराच्या हद्दीमध्ये पहिल्या २५ कि.मी.पर्यंत रुग्णवाहिका मारुती असेल तर ४०० रुपये, टाटासुमोला ४५० रुपये, विंगरला ५०० तर टेम्पो ट्रव्हलरला ६०० रुपये दर ठरविले. वातानुकूलित यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमूद दरात १० टक्के वाढ ठरवून दिली. महापालिकेच्या आत व हद्दीबाहेर २५ कि.मी. नंतरच्या प्रत्येक कि.मी. करिता रुग्णवाहिका मारुतीला नऊ, टाटासुमोला दहा, विंगरला अकरा तर टेम्पो ट्रव्हलर तेरा रुपये दर ठरविण्यात आले होते. याची माहिती आरटीओ कार्यालयाने मेडिकल, मेयो, महापालिकेचे रुग्णालय व आरोग्य सेवा मंडळाला पत्रातून दिली. यात अ‍ॅम्ब्युलन्सचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. परंतु वर्षे झालीत एकाही रुग्णालयाने हे दरपत्रक लावले नाही. परिणामी, अ‍ॅम्ब्युलन्स चालकांचा रुग्ण लुबाडणुकीचा धंदा तेजीत सुरू आहे.