शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खोटीनाटी माहिती देऊन महिलेने केले लग्न : ५० लाखांसाठी ब्लॅकमेलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 01:15 IST

खोटीनाटी माहिती देऊन एका धनाढ्य व्यक्तीसोबत लग्न करणाऱ्या एका महिलेने लग्नानंतर त्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले. ५० लाख रुपये मिळावे म्हणून त्याला साथीदारांमार्फत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून, पोलिसांनी याप्रकरणी पीडित पतीच्या तक्रारीवरून त्याची पत्नी समीरा फातेमा मुख्तार अहमद (वय ३५, रा. कामठी) तसेच तिचा साथीदार आनंद पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देमहिलेची पतीसोबत साळ्यालाही धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खोटीनाटी माहिती देऊन एका धनाढ्य व्यक्तीसोबत लग्न करणाऱ्या एका महिलेने लग्नानंतर त्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले. ५० लाख रुपये मिळावे म्हणून त्याला साथीदारांमार्फत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून, पोलिसांनी याप्रकरणी पीडित पतीच्या तक्रारीवरून त्याची पत्नी समीरा फातेमा मुख्तार अहमद (वय ३५, रा. कामठी) तसेच तिचा साथीदार आनंद पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.मोहम्मद तारिक मोहम्मद अनिस अहमद (वय ३४) यांच्यासोबत समीराने गेल्या वर्षी लग्न केले. तत्पूर्वी आपले यापूर्वी एकच लग्न झाले होते, असे समीराने आपल्या साथीदारांमार्फत तारिकला सांगितले होते. त्यावरून तारिकने तिच्याशी लग्न केले. समीरासोबत लग्न केल्यानंतर तारिकला भलतीसलती माहिती मिळाली. त्यामुळे ५ सप्टेंबर २०१८ पासून या दोघांमध्ये खटके उडणे सुरू झाले. समीराने नंतर तारिकला ५० लाखांची रक्कम मिळावी म्हणून छळणे सुरू केले. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचीही धमकी दिली. तिचा साथीदार आनंद पवार ८६५२१ ८३८२९ क्रमांकाच्या मोबाईलवरून त्याला तसेच तारिकच्या पत्नीचा भाऊ अंजार जिया यांना अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देऊ लागला. तारिकने हा प्रकार सहन न झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी मानकापूर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी समीरा तसेच आनंद पवारविरुद्ध फसवणूक, ब्लॅकमेलिंग तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Womenमहिलाfraudधोकेबाजी