शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा द्या!

By admin | Updated: June 29, 2017 02:36 IST

आदिवासी हे मूळ निवासीच आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा बहाल केला असून

लटारी मडावी : रिपाइं (आ) चा युवा व आदिवासी कार्यकर्ता मेळावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आदिवासी हे मूळ निवासीच आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा बहाल केला असून ९ आॅगस्ट रोजी जागतिक मूळ निवासी दिन पाळला जातो. परंतु भारत सरकारने अजूनही आदिवासींना हा दर्जा बहाल केलेला नाही. तेव्हा केंद्र सरकारने तातडीने आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा बहाल करावा, अशी मागणी रिपाइं (आ)च्या आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष लटारी मडावी यांनी बुधवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत केली. लटारी मडावी यांनी सांगितले की, आदिवासींच्या विविध प्रश्नांना घेऊन जनआंदोलन उभे करण्याच्या उद्देशाने रिपाइं (आ)च्या आदिवासी सेलच्यावतीने युवा व आदिवासी यांचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा येत्या १ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वानाडोंगरी येथील राजीव गांधी पॉलिटेक्निक परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे अध्यक्षस्थानी राहतील. माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे हे या मेळाव्याला मार्गदर्शन करतील. या मेळाव्यात संयुक्त राष्ट्राने जाहीर केल्याप्रमाणे आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा बहाल करणे, आदिवासीतील बोगस आदिवासींची घुसखोरी थांबविणे, आदिवासींट्आ पारंपरिक कायद्याला मान्यता देणे, पेसा कायदा सक्तीने लागू करणे, कुमारी मातांचे पुनर्वसन, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात जलदगती न्यायालय सुरू करणे, नक्षली विधवांचे पुनर्वसन, आदिवासीतील कुपोषण थांबविणे यावर सखोल चर्चा करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या धर्तीवर सर्व महामंडळांचे कर्ज माफ करण्यात यावे, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ करावी आणि शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेत रिपाइंचे प्रदेश महासचिव विकास गणवीर, शहराध्यक्ष राजन वाघमारे, दिनेश बन्सोड, सतीश तांबे, विनोद थूल, भीमराव मेश्राम, नंदू गावंडे, ज्ञानेश्वर सयाम, विलास कोडापे आदी उपस्थित होते.