नागपूर : १९९४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सामाजिक सुरक्षा समान पेन्शन योजना सुरू करून श्रावणबाळ, विधवा महिला, अपंग, निराधार यांना वाढत्या महागाईनुसार ५४०० रुपये महिना द्यावा आणि इतर मागण्यांसाठी आंबेडकरवादी संघर्ष पार्टीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मॉरिज कॉलेज टी पॉईंट येथे हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी नागरिकांनी जोरदार नारेबाजी करून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले. नेतृत्व आय. एल. नंदागवळीमागण्या निराधारांना ५४०० रुपये महिना द्यावानिराधारांचे चालू असलेले पगार बंद न करता सुरू ठेवावेविधवा महिलांचे मुल २५ वर्षाचे आणि अपंगाचे वय २५ वर्षाचे झाल्यानंतर पगार बंद करू नये६० वर्षानंतर शेतकरी, शेतमजुर, कामगारांना कोणतीही अट न लावता ५४०० रुपये महिना द्यावाघरकुलासाठी ३ लाख रुपयाचा निधी मंजूर करावा
निराधारांना ५४०० रुपये महिना द्या
By admin | Updated: December 17, 2015 03:30 IST