शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोबदला द्या, नाहीतर ‘किडनी विकू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:27 IST

घर व शेतीचा वाढीव मोबदला आणि शेतकºयांना किडनी विकण्याची परवानगी देण्याची मागणी करणारे आंदोलन शिवणगावातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी शुक्रवारी शिवणगावात केले.

ठळक मुद्देमिहान प्रकल्पग्रस्तांचे सूचक आंदोलन : उत्पन्नाचे स्रोत बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घर व शेतीचा वाढीव मोबदला आणि शेतकºयांना किडनी विकण्याची परवानगी देण्याची मागणी करणारे आंदोलन शिवणगावातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी शुक्रवारी शिवणगावात केले. राज्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. सूचक आंदोलनामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडतील आणि आमच्या मागणीकडे लक्ष देतील, अशी माहिती शिवणगावातील मिहान प्रकल्पग्रस्तांचे नेते बाबा डवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.प्रकल्पग्रस्तांचे उत्पन्नाचे स्रोत बंदडवरे यांनी सांगितले की, नागपूर मनपा हद्दींतर्गत असलेल्या १० हजार लोकसंख्येच्या शिवणगावात १२०० घरे आहेत. मिहान प्रकल्पाच्या घोषणेनंतर येथील शेतकºयांची दुर्दशा झाली. प्रशासनाने १२ वर्षांपूर्वी शिवणगावातील शेतकºयांची शेती आणि घरे अल्प मोबदला घेऊन बळजबरीने ताब्यात घेतली आणि धनाढ्य उद्योजकांना जास्त दरात विकली. शेतकºयांना पैसे मिळाले तेव्हा भावाभावांमध्ये वाटणी झाली. हाती मिळालेली खरी रक्कम मुलांचे शिक्षण आणि लग्नात खर्च झाली. घरांची रकमेची अशाच पद्धतीने विभागणी झाली. याशिवाय सरकारने नोकरी न देता एका कुटुंबाला ५ लाख रुपये दिले. तेसुद्धा वाटणीत संपले. पुनर्वसन करताना प्लॉट दिले, पण घर बांधायला पैसे नाहीत. सरकारने शेती व घरांचा ताबा घेतल्यामुळे शेतकºयांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहे. आता तर सर्वच बेरोजगार झाले आहेत. उत्पन्नाचा स्रोत नसल्यामुळे कुटुंबाचा खर्च चालविण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकºयांना सरकारने किडनी विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बाबा डवरे यांनी केली.अन्य शेतकºयांप्रमाणे शिवणगावातील शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा निर्णय बैठकीत पूर्वीच घेतला आहे.उद्योजकांना गर्भश्रीमंत करून शेतकºयांना देशोधडीला लावणाºया सरकारच्या विरोधात आमचा लढा निरंतर सुरू राहणार आहे. शेती आणि घराचा वाढीव मोबदला देण्याचे दिलेले आश्वासन सरकार विसरले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवणगाव मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ आहे. त्यांनी प्रकल्पग्रस्तांकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी डवरे यांनी केली.आंदोलनादरम्यान कुमार खोब्रागडे, रवी गुडधे, संजय डवरे, युवराज फुलझेले, अजय खोंडे, अमोल वानखेडे, गोपाल खोंडे, अरुण महाकाळकर, गोपाल वांगे, चेतन गाणार, पुष्पा गुडधे आणि शिवणगावातील हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.