शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वारीला परवानगी द्या, मंदिर उघडा; नागपुरात विहिंपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 16:30 IST

विहिपच्या नेतृत्वात नागपुरात वारकरी संप्रदायाचे प्रतीकात्मक दिंडी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साडेसातशे वर्षांची पायीवारीची परंपरा असलेल्या वारीला परवानगी द्या आणि राज्यातील सर्व मंदिर उघडा अशी मागणी करत शनिवारी विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने नागपुरात प्रतीकात्मक दिंडी आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात सुमारे अडीच तास विठ्ठलाची भजने गात वारकऱ्यांनी सरकारकडे आपली मागणी नोंदविली.

या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषदेसह विश्व वारकरी सेवा संस्था, ज्ञानदेव-तुकाराम प्रतिष्ठान, संत गजानन महाराज समिती, जलाराम सत्संग मंडळ, वैदर्भीय हरिकीर्तन संस्था, अखिल ब्रह्मवृंद संस्था आणि लोकजागृती मोर्चा आदी संस्थांनी आणि संघटनांनी सहभाग घेतला होता.

सद्गुरुदास महाराज, श्रीरामपंत जोशी, नारायण महाराज शिंदे,  भागीरथ महाराज, वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेचे शाम धुमकेकर महाराज, गीता अभ्यास मंडळाचे रमेश महाराज बनकर, विश्व वारकरी सेवा संस्थेचे संदीप महाराज कोहळे, अखिल ब्रह्मवृंद संस्थेचे दिगंबरबुवा नाईक, लोकजागृती मंचाचे रमणजी सेनाड, भगवत गीता अभ्यास मित्रमंडळाचे संजय पंदीलवार आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. वारकरी आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. दरम्यानच्या काळात विठ्ठलाची पदे आळवीत मृदुंग आणि टाळ निनादात वारकऱ्यांनी अभंग गायले. यामुळे एरवी आंदोलनाने गजबजणारा संविधान चौक आज भक्तिरसाने धुंद झाला होता. याप्रसंगी महाराष्ट्र क्षेत्र विहिपचे विशेष संपर्कप्रमुख अजय निंदलवर, विहिपचे विदर्भ प्रांत मंत्री सनत गुप्ता, उपाध्यक्ष हेमंत जांभेकर, प्रांत मंत्री गोविंद शेंडे, नागपूर शहर मंत्री प्रशांत पिपरे, मुकुंदबुवा देवसर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी