शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जलप्रदायच्या अधीक्षक अभियंत्यांना कारणे द्या नोटीस बजावा : महापौर संदीप जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:23 IST

विकासकामांच्या आढावा बैठकीची पूर्वसूचना देऊनही बैठकीला उपस्थित नसल्याने तसेच फोनला प्रतिसाद न दिल्याने मनपाच्या जलप्रदाय विभाग अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी मनपा प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देप्रभाग क्रमांक २६ (अ)च्या विकासकामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौरांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रभाग क्रमांक २६ मधील विकासकामांच्या आढावा बैठकीची पूर्वसूचना देऊनही बैठकीला उपस्थित नसल्याने तसेच फोनला प्रतिसाद न दिल्याने मनपाच्या जलप्रदाय विभाग अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी मनपा प्रशासनाला दिले.प्रभाग क्रमांक २६(अ)चे नगरसेवक अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या सूचनेनुसार महापौर कक्षात आढावा बैठक घेण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्त स्नेहा करपे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते.या बैठकीसंदर्भात श्वेता बॅनर्जी यांना पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतरही त्या उपस्थित झाल्या नाहीत. त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे मेश्राम यांनी महापौरांच्या निदर्शनास आणले. यावर महापौरांनी नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.दोन दिवसात माहिती सादर कराप्रभाग क्रमांक २६ (अ) मधील विकासकामांची तपशीलवार माहिती तसेच याशिवाय भांडेवाडी कंपोस्ट डेपो येथील सुरक्षा भिंत व मागील ३ वर्षात करण्यात आलेली कामे, कंत्राटदाराचे नाव, कामाची किंमत, आर्थिक वर्ष, कोणत्या पदाअंतर्गत काम केले याची संपूर्ण तपशीलवार माहिती दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

आसीनगर झोनचे उपअभियंता पझारे निलंबितमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार मंगळवारी आसीनगर झोनच्या करवसुली विभागाचे उपअभियंता अजय पझारे यांना अनुशासनहीनता प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे.सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त निर्भय जैन यांनी याबाबतचे आदेश जारी केले. कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (अनुशासन व अपील) नियम १९७९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जोपर्यंत निलंबन आदेश लागू राहील तोपर्यंत पझारे यांचे मुख्यालय आसीनगर झोन राहील. कार्यकारी अभियंता यांच्या अनुमतीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच या दरम्यान त्यांना दुसरे खासगी काम करता येणार नाही.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका