शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र द्या; हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 10:49 IST

High court Nagpur News अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र आणि त्यानुसार आवश्यक लाभ मिळावे याकरिता गोंदिया येथील विद्या खोबरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देकायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र आणि त्यानुसार आवश्यक लाभ मिळावे याकरिता जात प्रमाणपत्र कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी या विनंतीसह गोंदिया येथील विद्या खोबरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

उच्च न्यायालयाने नुपुर भागवत, माधवी रामटेके व आंचल बडवाईक यांच्या प्रकरणामध्ये आईच्या जातीचे प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, सरकारने त्यातून काहीच धडा घेतला नाही. आजही अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र नाकारले जात आहे. त्यामुळे पतीपासून विभक्त झालेल्या महिलांना व त्यांच्या अपत्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता जात प्रमाणपत्र कायद्यात तातडीने दुरुस्ती करून अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र जारी करण्याची तरतूद लागू करणे आवश्यक आहे असे खोबरेकर यांनी याचिकेत नमूद केले आहे.२०१८ पासून लढामुलगा मानस याला स्वत:च्या जातीचे प्रमाणपत्र मिळावे याकरिता खोबरेकर २०१८ पासून लढा देत आहेत. परंतु, उप-विभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना अद्याप संबंधित जात प्रमाणपत्र दिले नाही. विविध नियम सांगून त्यांना टाळण्यात आले. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खोबरेकर घटस्फोटित महिला आहेत. त्या मानसचा तो दोन वषार्चा असताना एकट्याने सांभाळ करीत आहेत.सरकारला हायकोर्टाची नोटीसन्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी राज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या याचिकेवर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, नागपूर येथील मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात मानसचा प्रवेश झाला असल्यास त्यास बाधा निर्माण करण्यास मनाई केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय