शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला सोडून बिहारला ‘पॅकेज’ का दिले?

By admin | Updated: October 12, 2015 02:53 IST

महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

संजय निरुपम : उत्तर भारतीय सभेचे वार्षिक अधिवेशन नागपूर : महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. महाराष्ट्रातील बळीराजाला दिलासा देण्याची गरज असताना केंद्र शासनाने बिहारला कसे काय विशेष ‘पॅकेज’ दिले, असा प्रश्न उपस्थित करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केंद्र सरकारवर टीका केली. कस्तुरचंद पार्क येथे उत्तर भारतीय सभेच्या वार्षिक अधिवेशनाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाला छत्तीसगड येथील खासदार ताम्रध्वज साहू, प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी, छत्तीसगडमधील अभिनेते ‘राजा छत्तीसगडिया’ ऊर्फ अनुज शर्मा, ज्येष्ठ पत्रकार सुमित अवस्थी, नरेंद्र शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यासाठी विशेष ‘पॅकेज’ द्यायला हवे होते. परंतु असे न करता राज्य शासनाने दुष्काळ कराच्या नावाखाली इंधनावर कर लावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत किती जिल्हे दुष्काळप्रभावित आहेत याची घोषणा शासनाने केलेली नाही, असे निरुपम म्हणाले. उत्तर भारतीय सभेचे काम राजकीय नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक आहे. उत्तर भारतीयांच्या सन्मानाची जपणूक करत असतानाच इतर भाषिक नागरिकांनाही योग्य मान दिला जातो. परंतु काही लोकांकडून भाषेच्या नावाखाली राजकारण करण्यात येते. सर्व भाषांचा सन्मान होणे आवश्यक आहे. परंतु जर कोणी भाषा, प्रांत, जात यांच्या नावाखाली एकता तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रत्युत्तर द्यायलाच हवे असे आवाहन निरुपम यांनी उपस्थितांना केले. यावेळी दंदे फाऊंडेशनचे संचालक अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, ज्येष्ठ पत्रकार संजय तिवारी, निवृत्त पोलीस अधिकारी रामलखन यादव, समाजसेवक पुरुषोत्तम लोणारे, राधेश्याम सारडा, शैलेश अवस्थी, अ‍ॅड. सुरेश शुक्ला, डॉ. हरविंदर गांधी, उमेश शाहू, जफर अहमद खान, गुणवंत विद्यार्थी कमल शाहू, मनोज पांडे, उमेश शाहू यांचा समाजगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उत्तर भारतीय सभेचे विदर्भ अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी प्रास्ताविक केले व विदर्भातील सभेच्या कार्याची माहिती दिली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी सभेतर्फे जिल्हाधिकारी कोषात ५१ हजार रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. मालिनी अवस्थी व अनुज शर्मा यांनीही आपल्या कलेचे सादरीकरण केले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.(प्रतिनिधी)