शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशात ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची संधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST

नागपूर : अमेरिकेतील एका कंपनीने भारतातील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविली असून, यासंदर्भात ...

नागपूर : अमेरिकेतील एका कंपनीने भारतातील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविली असून, यासंदर्भात एक वेगळाच फंडा अंगीकारला आहे. कंपनीने चक्क एका इंग्रजी वृत्तपत्रात मोठी जाहिरात देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी संधी द्यावी, असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे संबंधित कंपनी ही फारशी नावाजलेली नसून त्या कंपनीबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

लँडमस रिएलिटी व्हेंचर्स असे या कंपनीचे नाव आहे. संबंधित कंपनीने थेट पंतप्रधानांना उद्देशूनच जाहिरात जारी केली आहे. एनआयपी व नॉन एनआयपी प्रकल्पांमध्ये ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची इच्छा संबंधित कंपनीने दर्शविली आहे. इंडिया इन्व्हेस्टमेंट ग्रीडअंतर्गत येणारे प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला ५ ट्रिनियन डॉलर्सच्या टप्प्यावर नेण्यासाठी कंपनीला गुंतवणुकीची संधी द्यावी, असे आवाहन चेअरमन प्रदीपकुमार एस. यांनी केले आहे. मात्र, ही कंपनी फारशी नावाजलेली नाही. कंपनी खरोखरच अमेरिकेतील आहे की नाही, याबाबतही शाश्वती नाही. असे असताना सरकारचे लक्ष आकर्षित करण्याचा हा फंडा आहे, की यामागे आणखी काही विशेष गणित आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मार्केटिंगसाठी कोरोनामुक्तीचा दावा ?

देश कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना कंपनीने पूर्ण भारताला कोरोनामुक्त करण्याचा आराखडा असल्याचा दावा करीत आराखडा सादरीकरणाची संधी द्यावी, असे म्हटले आहे. मात्र, संबंधित कंपनी अमेरिकेतील आहे तर मग तेथील सरकारला कोरोनामुक्तीसाठी मदत करण्यासाठी योगदान का दिले नाही, तसेच मोठमोठ्या वैद्यकीय तज्ज्ञांना जे जमले नाही ते एक कंपनी कसे काय करून दाखविणार, असे सवाल उपस्थित होत आहेत.

अधिकारी भारतातील, पत्ता बंगळुरूचा

संबंधित कंपनीच्या संकेतस्थळाची पाहणी केली असता केवळ एका वेबपेजमध्ये माहिती आहे. चमूमध्ये प्रदीप कुमार यांच्या कुटुंबियांसह पाच व सल्लागार म्हणून पाच जणांची नावे आहेत; परंतु याअगोदर केलेले प्रकल्प, कंपनीची बॅलेन्सशीट, इतिहास याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नाही. कंपनीचे कार्यालय न्यू जर्सी येथे असल्याचे संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. मात्र, विविध कंपन्यांची विस्तृत माहिती उपलब्ध करून देणाऱ्या एका संकेतस्थळानुसार या कंपनीचा भारतातील पत्ता बंगळुरू येथील असून, कंपनी २०१५ मध्ये स्थापन झाली आहे. कंपनीची सुरुवातीची गुंतवणूक १० लाखांची होती, तर पेड अप कॅपिटल अवघ्या एका लाखाचे आहे. एखाद्या स्टार्टअपइतकी भारतात गुंतवणूक असताना या कंपनीची इतकी अवाढव्य गुंतवणूक करणारी जाहिरात कोड्यात टाकणारी आहे.