उपराजधानीत तिन्ही शाखांत मुलीच अव्वल वाणिज्यची विज्ञानवर बाजीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. वाणिज्य आणि मानव्यशास्त्र या अभ्यासक्रमांत मुलींनीच अव्वल क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनीच आपली ‘टॉप’ची परंपरा कायम ठेवली. शिक्षक रविवारी शाळेत‘सीबीएसई’ने रविवारी निकाल जाहीर केल्यामुळे शिक्षकांना सुटीच्या दिवशी शाळेत यावे लागले. बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले. मात्र काही शाळांमध्ये ‘टॉपर्स’चा टक्का मात्र खालावला व ९० टक्के गुण मिळविणारे कमी विद्यार्थी दिसून आले.शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भवन्स बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स), सेंटर पॉईन्ट (काटोल रोड) या शाळांमध्ये सर्वात जास्त ‘टॉपर्स’ आहेत.बारावी ‘सीबीएसई’च्या परीक्षेला शहरातील २० शाळांमधून सुमारे १,६०० विद्यार्थी बसले होते. ९ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत परीक्षा झाली. निकाल कधी लागेल यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. जवळपास २०० विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण आहेत. यात विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त असल्याची माहिती शाळांतर्फे देण्यात आली आहे. तिन्ही शाखांमधील पहिल्या २५ मध्ये विद्यार्थिनींचेच प्रमाण अधिक असून केवळ चार विद्यार्थ्यांना यात स्थान मिळविता आले आहे.सामान्यत: विज्ञान विषयात जास्त गुण मिळतात असा समज आहे. मात्र ‘सीबीएसई’च्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी यंदादेखील उल्लेखनीय कामगिरी करून शहरातून अव्वल स्थान पटकाविले. ‘मेट्रो’ शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वाणिज्य शाखेला मागणी वाढत असून अनेक गुणवंत विद्यार्थी इकडे वळत आहेत. येणाऱ्या काळात वाणिज्य शाखेवर विद्यार्थ्यांचा जास्त भर नक्कीच दिसून येईल असा विश्वास अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखविला. वाणिज्य शाखा१मधुरिमा साहाभवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९८.० %२शुभांगिनी स्वर्णकारभवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९७.८ % ३मेघना अग्रवालभवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स ९७.४ %३सुयश राऊतभवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९७.४ %४महिमा छाबरानीभवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर९७.२ %४हर्षिता अग्रवालभवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९७.२ %४वरुण अग्रवालभवन्स बी.पी.विद्यामंदिर,सिव्हिल लाईन्स९७.२ %४रक्षा बत्राभवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९७.२ %५ गरीमा बत्रानारायणा विद्यालयम्९६.६० %विज्ञान शाखा१ शिवम पोतदारकेंद्रीय विद्यालय, वायुसेना नगर९७.६ %२ओजस्वी चौथाईवालेसेंटर पॉईन्ट, काटोल रोड९७.२ %३पारस सोहंदानीभवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९६.४ %३गार्गी मैत्रभवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९६.४ %४मुस्कान राजपूतसेंटर पॉईन्ट, काटोल रोड९५.८ %५आयुषी मंत्रीभवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९५.६ %५सचनूर कौर भाटियासेंटर पॉईन्ट, काटोल रोड९५.६ %
गर्ल्स रॉक्स!
By admin | Updated: May 29, 2017 02:50 IST