शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हुडकेश्वरमधील मुली भोपाळला

By admin | Updated: July 17, 2015 03:24 IST

रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या हुडकेश्वरमधील दोन मुली अवघ्या ४८ तासात पोलिसांनी शोधल्या.

‘आॅपरेशन मुस्कान’ चे फलित: सुखरूप पालकांच्या हवाली नागपूर : रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या हुडकेश्वरमधील दोन मुली अवघ्या ४८ तासात पोलिसांनी शोधल्या. त्यांना भोपाळला ताब्यात घेतल्यानंतर पालकांच्या सुखरूप हवाली करण्यात आले. शहर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’चे हे फलित होय.क्षुल्लक कारणावरून राग आल्यामुळे हुडकेश्वरमधून रविवारी सायंकाळी दोन चुलतबहिणी बेपत्ता झाल्या. एक २२ वर्षांची आणि दुसरी १४ वर्षांची आहे. अचानक मुली बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या पालकांना जबर धक्का बसला. सर्वत्र शोधाशोध करूनही काही पत्ता लागेना. त्यामुळे पालकांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली, नंतर गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांची भेट घेतली. सामाजिक सुरक्षा शाखेच्या पथकाचे प्रमुख बाजीराव पोवार यांनी लगेच सायबर सेलच्या माध्यमातून मुलींचे मोबाईल लोकेशन काढले. त्या भोपाळला असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, मुलीचा भाऊ भोपाळला नेहरूनगरात राहतो. मात्र तो मुंबईला गेला होता. त्यामुळे या मुलींच्या सुरक्षेची चिंता साऱ्यांनाच सतावू लागली होती. मात्र, भोपाळ पोलिसांच्या मदतीने त्यांना तेथे ताब्यात घेण्यात आले, नंतर पोलिसांचे एक पथक पालकासह भोपाळला पोहोचले. ही सर्व मंडळी मुलींना सुखरूप घेऊन बुधवारी नागपुरात आली. त्यामुळे पालक आणि त्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये आनंदीआनंद आहे.(प्रतिनिधी) पारडीतील मुलगा दिघोरीतबुधवारी एक शाळकरी मुलगा (वय १०, रा. पारडी) वाईट सवयीच्या मुलासोबत दिघोरीत पोहोचला. रात्रीचे ९ वाजले. मुलगा शाळेतून घरी परतला नाही म्हणून घाबरलेल्या पालकांनी कळमना ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, एका पत्रकाराने दिघोरीत एक शाळकरी मुलगा संशयास्पद अवस्थेत असल्याचे पोलिसांना कळविले. गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहचले आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या पालकांच्या हवाली केले.