शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘सीए’मध्ये मुलींचाच दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 10:58 IST

‘आयसीएआय’तर्फे (द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया) ‘सीए’ अंतिम वर्षांच्या नवीन व जुना अभ्यासक्रम, ‘फाऊंडेशन’ परीक्षा व ‘सीपीटी’चा (कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट) निकाल जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देप्रियांशी व दिशा नागपुरात ‘टॉप’ देशपातळीवर १५ वा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आयसीएआय’तर्फे (द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया) ‘सीए’ अंतिम वर्षांच्या नवीन व जुना अभ्यासक्रम, ‘फाऊंडेशन’ परीक्षा व ‘सीपीटी’चा (कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट) निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालांमध्ये विद्यार्थिनींचाच दबदबा राहिला आहे. ‘टॉपर्स’मध्येदेखील विद्यार्थिनींचाच जास्त प्रमाणात समावेश आहे.नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या ‘सीए’ अंतिम वर्ष (नवीन अभ्यासक्रम) परीक्षेत नागपूरच्या प्रियांशी जैन व दिशा बतरा (जुना अभ्यासक्रम) यांनी अखिल भारतीय पातळीवर १५ वा क्रमांक पटकावला. या दोघी नागपुरात त्यांच्या अभ्यासक्रमात ‘टॉपर्स’ असण्याची शक्यता आहे. चिराग बतरा (नवीन अभ्यासक्रम) याने अखिल भारतीय पातळीवर १७ वा क्रमांक प्राप्त केला.चिराग नागपुरातून दुसऱ्या स्थानावर असण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय पातळीवर ४९ वा क्रमांक प्राप्त करणारा राहुल आहुजा हा शहरातूनच तिसऱ्या स्थानावर असू शकतो. अनेक विद्यार्थ्यांनी रात्री उशिरापर्यंत निकालपाहिले नव्हते.‘आयसीएआय’च्या नागपूर शाखेचे अध्यक्ष उमंग अग्रवाल यांच्यानुसार या परीक्षांत मागील वर्षीच्या तुलनेत चांगले निकाल आले आहे. विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. निकाल उशिरा घोषित झाल्यामुळे नागपुरातील नेमके किती विद्यार्थी यशस्वी झाले, हे कळू शकलेले नाही.  ‘सीए’ परीक्षांच्या तयारीशी जुळलेले तज्ज्ञ रुपेश जारोदे यांनी निकाल उत्साहित करणारे असल्याचे सांगितले.

‘फाऊंडेशन’मध्ये वैष्णवी तिवारी देशात ३३ व्या स्थानीप्राप्त माहितीनुसार नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या ‘सीए फाऊंडेशन’च्या परीक्षेत वैष्णवी तिवारी हिने अखिल भारतीय पातळीवर ३३ वा क्रमांक मिळविला आहे. ती नागपुरातून अव्वल असण्याची शक्यता आहे. देशभरात ४२ वा क्रमांक मिळविणारा आकाश साहू शहरातून दुसऱ्या स्थानी असू शकतो. करण बजाज याचा अखिल भारतीय पातळीवर ४७ वा क्रमांक आला. याशिवाय आदर्श अग्रवाल, सम्यक मोदी, यश दलाल, राजवीरसिंह भाटिया, अमन अग्रवाल, संस्कर अग्रवाल, कौशल टिबरेवाल यांनीदेखील ‘सीए फाऊंडेशन’च्या परीक्षेत उत्तम गुण मिळवत यश प्राप्त केले. वृत्त लिहिपर्यंत ‘सीपीटी’मध्ये श्रेय चांडक याने पहिले स्थान पटकाविल्याची माहिती मिळाली तर आतिशय बाकलिवाल दुसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :examपरीक्षा