नागपूर : बारावीत नागपूर महापालिकेच्या शाळांतील ३१२ पैकी २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९१ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेच्या १५० पैकी १४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी ९५ टक्के आहे. कला शाखेतील १०४ पैकी ९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९३ टक्के निकाल तर वाणिज्य शाखेच्या ५८ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७६ टक्के निकाल लागला.मनपाच्या विज्ञान शाखेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेतून श्रुतिका देऊ ळकर ही ८०.९२ टक्के गुण मिळवून मनपा शाळेतून प्रथम आली. याच शाळेचा कौस्तुभ सातकर याला ८०.१५ टक्के तर प्रीती शेंडे हिला ७८ टक्के गुण मिळाले. उर्दू माध्यमाच्या सानेगुरुजी उच्च माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी शेख इशरत जबीन वहाब हिने ८०.९२ टक्के गुण मिळवून ती या शाखेतून मनपा शाळात प्रथम आली. याच शाळेची गुलनाज परवीन सल्लन हिने ७६.२२ टक्के तर सलीबर बानो शेख शौकत हिला ७६.१५ टक्के गुण मिळाले. त्यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेच्या एम.ए. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी तबस्सूम सबा साबीर हिने ७३.३८ टक्के गुणासह पहिला, गौसिया बानो अनिस अहमद हिने ७१.२३ टक्के गुणासह दुसरा तर सायमा तरन्नुम हसन हिला ७०.४६ टक्के गुण मिळाले. ती शाखेतून तिसरी आली.(प्रतिनिधी)
मनपाची शाळा बेस्ट पहिल्या तीनमध्ये मुलीच
By admin | Updated: May 28, 2015 02:26 IST