शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गीर गाईची दुग्धक्रांती; महिन्याकाठी होतेय दीड लाख लिटरची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 12:16 IST

Nagpur News Milk नागपुरात गेल्या काही महिन्यात, विशेषत: कोरोनाच्या काळात गीर गाईच्या दुधाची मागणी प्रचंड वाढली आहे. नागपुरात पारंपरिक दुग्धक्रांतीला प्रोत्साहन मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देदिवाळीच्या पार्श्वभूमीवर ओघ वाढण्याची शक्यता

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून सेंद्रिय पद्धतीने खाद्य उत्पादने घेण्याकडे उत्पादकांचा व खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात गेल्या काही महिन्यात, विशेषत: कोरोनाच्या काळात गीर गाईच्या दुधाची मागणी प्रचंड वाढली आहे. महिन्याकाठी दीड लाख लिटर दुधाची होणारी खुली विक्री पाहता नागपुरात पारंपरिक दुग्धक्रांतीला प्रोत्साहन मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवरील त्रिकोणी प्रदेशातूनही काठियावाडी बेडे देशभरात विखुरलेले आहेत. नागपूर जिल्ह्यातही चहूबाजूंनी २०० हून अधिक हे बेडे आहेत. या प्रत्येक बेड्यात दहा ते बारा कुटुंबे असतात आणि प्रत्येक बेड्यात १५० ते एक हजारावर गीर प्रजातीच्या अर्थात शुद्ध स्वरूपातील देशी गाई आहेत. हे सगळे बेडे मिळून महिन्याकाठी लाखो लिटर दूध घेत असतात आणि मोठमोठ्या ब्रॅण्डसला पुरवठा करत असतात. काही दूध खुल्या स्वरूपातही विकले जाते. नागरिकांकडून या दुधाची खुली मागणी व्हायला लागली. त्यामुळे, महिन्याकाळी काही हजार खुल्या दुधाची विक्री कोरोनाकाळात दीड लाख लिटरपर्यंत वाढली आहे. आता दिवाळीच्या काळात दुधाची मागणी प्रचंड असते आणि तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे या काठियावाडी बेड्यांनी आता स्वत:च कंबर कसली असून, प्रत्यक्ष सेवा देण्याच्या तयारी केली आहे.१०० ते १२० रुपये लिटरने विक्रीसर्वसाधारण पॅकेट्सचे दूध ४८ रुपये लिटरने ग्राहकांना मिळते. गाईचे गोठे सांभाळणारे खुल्या दुधाची विक्री ५० ते ६० रुपये लिटरने करत आहेत. मात्र, गीर प्रजातीच्या गाईंचे होणारे पारंपरिक आरोग्यदायी पोषण बघता आणि दुधातील पौष्टिकता बघता अनेक नागरिक गीर दुधाची मागणी करत आहेत. हे दूध १०० ते १२० रुपये लिटरने विकले जात आहे.देशी गाईचे महत्त्व लोकांना पटायला लागले आहे. त्यामुळेच गीर गाईचे दूध मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. या बेड्यांना संघटित करत सर्वसामान्यांना सर्वसामान्य किमतीत हे आरोग्यदायी दूध मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. आता खऱ्या अर्थाने शहरात दुग्धक्रांती घडत आहे.- मुकुंद अड्येवार - संचालक, गोकुळगंगा पशू व कृषी अनुसंधान केंद्र

 

 

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठा