कधी कधी अनवधानाने चुकीची गोष्टी बोलली जाते पण त्यामुळे मोठा गोंधळ उडतो आणि नाराजी निर्माण होते. गिलख्रिस्टची चूक भारतीय चाहत्यांनी लक्षात आणून दिल्यावर त्याने माफी मागितली. काही दिवसांपूर्वी भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. सामना सुरू असताना गिलख्रिस्टने फॉक्स चॅनलवर समालोचन करताना अनवधानाने सिराजच्या ऐवजी नवदीप सैनीच्या वडिलांचे निधन झाले असा उल्लेख केला. सोशल मीडियावर एका चाहत्याने त्याचा व्हिडिओ शेअर केला आणि गिलख्रिस्टला चूक दाखवून दिली. त्यावर गिलख्रिस्टने चूक मान्य केली आणि माफी मागितली. ज्या भारतीय चाहत्याने चूक दाखवून दिली त्याचे आभार देखील मानले.
भारतीय खेळाडूबाबत गिलख्रिस्टने केली मोठी चूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST