नागपूर : चैत्र प्रतिपदेपासून अर्थात २ एप्रिलपासून चैत्र नवरात्रास प्रारंभ होत आहे. त्याअनुषंगाने देवस्थानांमध्ये घटस्थापनेसंदर्भातील तयारी पूर्ण झाल्या आहेत. यंदा कसलेही निर्बंध नसल्याने भाविक मोकळेपणाने देवीचे दर्शन करण्यास मंदिरांमध्ये येऊ शकणार आहेत.
नवरात्रातील सर्व दिवस शुभ मानले जातात. परंतु, यंदा गृहनक्षत्रांचा प्रभाव असल्याने विशेष संयोग दिसून असल्याने नवरात्र अधिक फलदायी ठरणार आहे. नवरात्रातील चार दिवस सर्वार्थसिद्धी योग दिसून येत आहेत. त्याचप्रकारे सहा दिवस रवी योग आहे. नवरात्राच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच रामनवमीला रवीपुष्य योगाचा महासंयोग घडून आला आहे.
चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडव्यासोबतच शनिवारी नवरात्रास प्रारंभ होईल. शनिवारपासून १० एप्रिलपर्यंत देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाईल. पं. उमेश तिवारी यांनी सांगितल्यानुसार नवरात्रात सर्व प्रकारच्या खरेदीसाठी शुभ मानले जाते. या दिवसांत सोने, चांदी, वाहन, भूमी, भवन, आदींची खरेदी करणे शुभ आहे. नवरात्रात सर्वार्थसिद्धी योग, रवी योग असे शुभ संयोग घडून येत आहेत. २ एप्रिलपासून सर्वार्थसिद्धी व रवी पुष्य योगाचा संयोग घडून येत असल्याचे तिवारी यांनी सांगितले.
.................