शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जन्माला येणाऱ्या १० लाख मुलांमध्ये अनुवांशिक आजार

By admin | Updated: December 1, 2014 00:50 IST

दरवर्षी जन्माला येणाऱ्या १० लाख मुलांमध्ये अनुवांशिक आजार (जेनेटीक डिसआॅर्डर) आढळून येतो. यात शरीराच्या बाह्यभागासोबतच आंतर अवयवांमध्ये आलेले व्यंग, जन्मापासून असणारी

राष्ट्रीय बालरोग परिषदेचा समारोपनागपूर : दरवर्षी जन्माला येणाऱ्या १० लाख मुलांमध्ये अनुवांशिक आजार (जेनेटीक डिसआॅर्डर) आढळून येतो. यात शरीराच्या बाह्यभागासोबतच आंतर अवयवांमध्ये आलेले व्यंग, जन्मापासून असणारी मानसिक विकृती (डाऊन सिन्ड्रोम) किंवा मधुमेह व हृदयरोगासारख्या आजाराने मुले पीडित असतात. अशा रुग्णांना वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळाल्यास या आजारांवर उपचार शक्य आहे. परंतु स्त्री गर्भवती असतानाच या बाबत निदान झाल्यास हे आजार टाळताही येऊ शकतात, अशी माहिती एम्सच्या बालरोग विभागातील जेनेटिक विभागाचे प्राध्यापक डॉ. आय.सी. वर्मा यांनी दिली.अकादमी आॅफ पीडियाट्रिक्स नागपूर शाखेतर्फे दोन दिवसीय बालरोग परिषद ‘नॅपकॉन-२०१४’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे शनिवारी या परिषदेचे थाटात उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आय.सी. वर्मा, डॉ. अनिल राऊत, डॉ. डी.एस. राऊत व डॉ. चेतन शेंडे यांच्यासह इंडियन अकादमी आॅफ पीडियाट्रिक्सशी संलग्न असलेल्या अकादमी आॅफ पीडियाट्रिक्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या समाजात लग्न होण्यापूर्वी कुंडली पाहिली जाते, परंतु सुदृढ समाजासाठी ‘जिनोमपत्री’ काढणे आवश्यक आहे, असेही डॉ. वर्मा म्हणाले. डेंग्यूच्या मृत्यूची संख्या वाढतेयडॉ. महेश मोहिते म्हणाले, डेंग्यू पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाला पुन्हा डेंग्यू झाल्यास मृत्यूची शक्यता वाढते. म्हणूनच मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यूच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. शासनाने आत्ताच खबरदारी घेतली नाहीतर भविष्यात मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी प्रत्येकाने समोर येणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. परिषदेत जनुकीय दोषांमुळे उद्भवणारे आजार या विषयावर तज्ज्ञानी मार्गदर्शन केले. देशभरातून ४०० बालरोगतज्ज्ञ परिषदेत सहभागी झाले होते. डॉ. एन.के. सुब्रम्हण्यम, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ. संजय लालवानी, डॉ. सतीश देवपुजारी आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सुचित बागडे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. दांडगे, डॉ. वसंत खळतकर, डॉ. उपाध्ये, डॉ. मोगरे, डॉ. देशमुख, डॉ. मंडलिक, डॉ. कुश झुनझुनवाला आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)