शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील गे जोडप्यांनी केले ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:26 IST

३७७ हे कलम हटल्यानंतर समाजात समलैंगिक नागरिकांविषयी कुतुहलासोबतच जी जागृती आली आहे ती ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अधिक विस्तारेल असा विश्वास नागपुरातील एका गे जोडप्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देवस्तुस्थिती आणि चित्रपटात बरीच तफावत असल्याचेही मत

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ३७७ हे कलम हटल्यानंतर समाजात समलैंगिक नागरिकांविषयी कुतुहलासोबतच जी जागृती आली आहे ती ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अधिक विस्तारेल असा विश्वास नागपुरातील एका गे जोडप्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.निखिल व रवी (नावे बदलली आहेत) हे नागपुरातील एक गे जोडपे. गेल्या सहा वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनी गे व्यक्तींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहिला असून त्यांनी त्याविषयी समाधान व्यक्त केला आहे. शहरातील गे तरुणांनी हा चित्रपट मोठ्या उत्साहात पाहिला व आपल्या प्रतिक्रिया दिल्या.गे व्यक्तींना त्यांचे कुटुंबच सर्वात प्रथम स्वीकारत नाही ही वस्तुस्थिती या चित्रपटाने समाजासमोर नीट आणली आहे. त्यांचे सख्खे नातेवाईक व कुटुंबियच त्यांना नाकारतात तर मग समाज फार दूरच राहिला. या दोघांपैकी निखिलला अद्यापी त्याच्या कुटुंबाने स्वीकारलेले नाही. तो नोकरी करतो व एकटाच राहतो.चित्रपटात दाखवल्याप्रमाणे गे व्यक्तींमध्ये खूप घट्ट नाते असते. ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. ते अतिशय भावनाप्रधान असतात. बाहेरच्या जगातली समस्या ते एकवेळ सोडवू शकतात पण नात्यातला तणाव त्यांना सहन होत नसतो. या चित्रपटात दाखल्याप्रमाणे आपण गे आहोत याचा स्वीकार करणेही गे व्यक्तीला खूप जड जात असते. तसा स्वीकार स्वत:सोबत व जगासोबत करणे यासाठी फार हिंमत लागते. कुणाचा तरी आधार लागतो.हा चित्रपट करमणुकीच्या दृष्टीने थोडा विनोदी बनवला आहे. त्याने बॉक्स आॅफिसवर यशही मिळवले आहे. तो विनोदी बनवल्याने त्याला पाहण्यासाठी जास्तीतजास्त लोक येतील असे वाटते. हा चित्रपट जर गंभीर स्वरुपाचा असता तर तो कुणीच पाहिला नसता असे निखिलचे मत पडले.आपल्या बाजूला बसलेली व्यक्ती ही गे, लेस्बियन वा तृतीयपंथी आहे हे कळल्यावर जो धक्का बसतो तो बसणे जेव्हा थांबेल तेव्हाच खऱ्या अर्थाने लिंगसमानता आली असे म्हणता येईल.नागपुरात समलैंगिक व्यक्तींसाठी काम करणाºया सारथी ट्रस्टचे प्रमुख आनंद चंद्राणी व निकुंज जोशी या दोघांनीही अशा प्रकारच्या चित्रपटांमुळे समाजाची समलैंगिक व्यक्तींकडे पाहण्याची पूर्वग्रहदूषित नजर बदलेल असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :LGBTएलजीबीटी