लोकमत सखी मंच व श्रीमय ड्रायव्हिंग स्कूलचे आयोजन
नागपूर : काेराेना महामारी सर्वांच्या जीवनात कठीण काळाप्रमाणे हाेती. हळूहळू परिस्थिती बदलत आहे. लाॅकडाऊनच्या काळात अनेक चांगले आणि वाईट अनुभव लाेकांना आले. अशाच चांगल्या-वाईट परिस्थितीवर आधारित ‘गाेविंदा इन लाॅकडाऊन’ या हास्य नाटकाचा जन्म झाला. येत्या ७ फेब्रुवारी राेजी रेशीमबागस्थित कविवर्य सुरेश भट सभागृहात येत्या ७ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ६ वाजता या नाटकाचे आयाेजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखक व कलावंताद्वारे लिखित या नाटकाचे निर्देशन नरेश गडेकर यांनी तर निर्मिती आसावरी तिडके यांची आहे. संस्कार मल्टिसर्व्हिसेस निर्मित, गंधर्व क्रिएशनद्वारा तयार या नाटकात नरेश गडेकर, आसावरी तिडके, माझ्या नवऱ्याची बायकाे फेम देवेंद्र तुटे, मुग्धा देशकर व सिंबा फेम राजेश चिटणीस यांचा अभिनय राहणार आहे. नेहा जोशी यांच्या ९८५०३०४०३७, ९९२२९६८५२६ या मोबाइल क्रमांकावर आणि दीपाली तुमाने यांच्या ९८२३०२००५२ या माेबाईल क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकताे.
तुमची साेबत आवश्यक : तुमाने
श्रीमय ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका दीपाली तुमाने म्हणाल्या, लाॅकडाऊनचा सर्वांवर प्रभाव पडला आहे. अशा अवस्थेत सर्वांनी एकजूट हाेणे आवश्यक आहे. सर्वांनी मिळून या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. या नाटकाच्या माध्यमातून हाच प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नात आम्हाला आपल्या साेबतीची गरज आहे आणि आपले सहकार्य मिळेल, याचा विश्वास आहे. आम्ही आपल्या सेवेत कायम तयार राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.