शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पळून जाण्यात गौस टोळी सराईत

By admin | Updated: April 1, 2015 02:31 IST

पोलिसांवर गोळीबार करून जगनाडे चौकातून पळून जाणाऱ्या कुख्यात सत्येंद्र गुप्ताने आता कारागृहातून पळ काढून शहर पोलिसांना दुसऱ्यांदा आव्हान दिले आहे.

नागपूर : पोलिसांवर गोळीबार करून जगनाडे चौकातून पळून जाणाऱ्या कुख्यात सत्येंद्र गुप्ताने आता कारागृहातून पळ काढून शहर पोलिसांना दुसऱ्यांदा आव्हान दिले आहे. कुख्यात राजा गौसचा राईट हॅण्ड मानला जाणाऱ्या गुप्ताला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा अनुभव आहे. १७ एप्रिलच्या सायंकाळी उंटखाना परिसरात गौस आणि गुप्ताने एका तरुणीची छेड काढली. तिच्या मित्राने हटकले म्हणून त्याच्यावर गोळी झाडून त्याची हत्या केली. यानंतर मध्यरात्री त्यांनी जगनाडे चौकात पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी त्यांची बरीच शोधाशोध केली मात्र, ते शहरात सापडलेच नाही. बरेच दिवसानंतर गौसला उत्तर प्रदेशात तर गुप्ताला मध्य प्रदेशात गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. या दोघांच्या चौकशीतून बिशनसिंग उकेचे नाव पुढे आले. तो जबलपूरचा रहिवासी आहे. गुन्हे केल्यानंतर राजा गौस साथीदारांसह तिकडे पळून जायचा तेव्हा बिशनसिंग त्यांना आश्रय द्यायचा. नंतर तो राजासोबत नागपुरात येऊनही गुन्हे करू लागला. त्यामुळेच राजा गौस, गुप्ता सोबत पोलिसांनी बिशनसिंगवरही मोका लावला होता. कारागृहात राजा गौसने आपली टोळी वाढवली. शिबू, गोलू, नेपालीसोबतच अनेक गुन्हेगारांना टोळीत सहभागी केले. त्यांना तो कारागृहात सुविधा पुरविण्यासाठी खर्चही करीत होता. यामुळेच चोरटा गोलू आणि कुणीच नातेवाईक आसपास नसलेला नेपाली चक्क कारागृहातून पळून जाण्याचा निर्ढावलेपणा दाखवू शकला. यापूर्वी गोळीबार करून आणि आता पळून जाऊन गौस टोळीतील गुन्हेगारांनी शहर पोलिसांना आव्हान दिले आहे. (प्रतिनिधी)