शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गौरव ‘शौर्य’ देऊन गेला

By admin | Updated: January 19, 2016 03:53 IST

दीड वर्षांपूर्वी आपल्या प्राणांची आहुती देऊन अंबाझरी तलावात बुडत असलेल्या चौघा जिवलग मित्रांना वाचविणाऱ्या

नागपूर : दीड वर्षांपूर्वी आपल्या प्राणांची आहुती देऊन अंबाझरी तलावात बुडत असलेल्या चौघा जिवलग मित्रांना वाचविणाऱ्या गौरव कवडूजी सहस्रबुद्धे या विद्यार्थ्याच्या आठवणी सोमवारी पुन्हा जाग्या झाल्या. गौरवची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यातही गौरवच्या शौर्याची विशेष दखल घेत शौर्य पुरस्कारामध्ये सर्वोच्च असलेल्या भारत पुरस्काराचा मानही त्याला मिळाला आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिद्धार्थ यांनी सोमवारी केलेल्या बाल शौर्य पुरस्काराच्या घोषणेने प्रत्येक नागपूरकरासाठी गर्वाने मान उंचाविली. यावर्षी देशभरातील २५ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, त्यामध्ये गौरव सहस्रबुद्धेचाही समावेश आहे. ही बातमी जेव्हा गौरव राहत असलेल्या टाकळी सीम परिसरात पसरली तेव्हा वस्तीतील नागरिकही शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचत आहेत. अर्थातच या सर्वांच्या मनात एक खंत कायम आहे, चार कु टुंबाला आनंदाचा क्षण देणारा गौरव पुरस्काराचा आनंद साजरा करण्यासाठी आता आपल्यात नाही. ३ जून २०१४ रोजी घडलेली ही घटना. १० वीची परीक्षा नुकतीच संपली होती. अंबाझरी तलावाजवळ खेळत असताना आपले चार मित्र बुडत असल्याचे त्याने पाहिले. प्राणाची पर्वा न करता त्याने पाण्यात उडी घेतली आणि एकेक करीत तीन मित्रांना पाण्याबाहेर काढले. एवढ्यात तो थकला होता. मात्र तरीही चौथ्या मित्राला काढण्यासाठी तो सरसावला आणि त्याने चौथ्याला किनाऱ्यावर काढलेही. मात्र तोपर्यंत पूर्णपणे गतप्राण झालेला गौरव स्वत: मात्र पाण्याबाहेर येऊच शकला नाही. गौरवची आई आणि वडील हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. २४ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरवची आई रेखा सहस्रबुद्धे हा पुरस्कार स्वीकारतील. आठवणीने शेजारीही गहिवरलेशेजारी राहणारे मनोज सिरिया यांना गौरव काका म्हणायचा. गौरवला शौर्य पुरस्क ार मिळावा म्हणून त्यांनीही प्रयत्न केले. शासनाच्या बालकल्याण विभागाकडून आलेला फोन त्यांनाच मिळाला होता. गौरवचे शौर्य अतुलनीय असेच असल्याचे मनोज सिरिया म्हणाले. आज जेव्हा त्याला पुरस्कार मिळाला तेव्हा त्याची कमतरता नक्कीच भासत आहे. तो पोहण्यात हुशार होता आणि त्याने या गुणाचे चीजही केले. त्याचा आम्हाला गर्व आहे. मात्र तो आज जिवंत असायला हवा होता, अशी भावना सिरिया यांनी व्यक्त केली.