शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

गॅस्ट्रोचा सावरगावला स्ट्रोक!

By admin | Updated: July 19, 2016 02:47 IST

राज्यात वर्षभरात गॅस्ट्रोचे जेवढे रुग्ण आढळून येत नाही तेवढे रुग्ण एकट्या नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे आढळून

नागपूर : राज्यात वर्षभरात गॅस्ट्रोचे जेवढे रुग्ण आढळून येत नाही तेवढे रुग्ण एकट्या नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे आढळून आले. ११ ते १७ जुलैदरम्यान तब्बल ७६९ रुग्णांनी उपचार घेतले. यातील २५० रुग्णांना इस्पितळता भरती करून उपचार करण्यात आले. यातील दोघांचा मृत्यू झाला. आजही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत. असे असताना नागपुरात सोमवारी आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता सौनिक व संचालक डॉ. मोहन जाधव उपस्थित असताना त्यांनी सावरगावाला भेट दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.प्रत्येकाला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. वीज आणि पाणी यांचा पुरवठा करण्यासाठी सरकारकडून शुल्क आकारले जाते. परंतु सावरगावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सरकारी यंत्रणेच्या अकार्यक्षमतेचा फटका शेकडो लोकांना बसला. ११ जुलैपासून सावरगावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गॅस्ट्रोचे रुग्ण यायला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी २६ रुग्ण आले होते. परंतु १२ आणि १३ तारखेला अचानक रुग्णांची संख्या वाढली. ४सोमवारी २३ रुग्ण आढळून आले असून, यातील आठ रुग्णांना भरती केले असल्याची माहिती आहे. ४सावरगावात सात दिवसांत गॅस्ट्रोसारख्या आजाराने थैमान घातले असताना व या आजाराची आजही दहशत असताना राज्याच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयातील एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नाही.४विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने एका प्रकरणात आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता सौनिक व संचालक डॉ. मोहन जाधव यांना समन्स बजावल्याने हे दोन्ही अधिकारी सोमवारी नागपुरात होते. परंतु ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगावकडे या अधिकाऱ्यांंनीही पाठ दाखविली.सावरगावला जाता आले नाहीआरोग्य विभागाचे संचालक डॉ. मोहन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दुपारी ४.३० वाजता न्यायालयाचे कामकाज संपले. त्यावेळी सावरगावला जाऊन उद्याच्या मुंबईच्या बैठकांना उपस्थित राहणे हे शक्य नव्हते. यामुळे सावरगावला जाता आले नाही.