शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून घराघरात कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ११३ सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याने बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी रविवारीही काम बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ११३ सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याने बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी रविवारीही काम बंद ठेवले. यामुळे सहा झोनमधील कचरा संकलन ठप्प होते. झोन ६ ते १० मधील घराघरात कचरा साचून असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, तर काही जण घरातील कचरा रस्त्यावर फेकत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संपावर वेळीच तोडगा न काढल्यास अर्ध्या शहरात कचऱ्याची गंभीर समस्या उभी ठाकणार आहे.

प्रमुख रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी उचलले. मात्र, वस्त्यांतील व घरातील कचरा तसाच साचून आहे. नागपूर शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे आहे. यातील गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी अशा झोनची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे. या कंपनीने ११३ कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र, यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मनपाच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना रविवारी चर्चेसाठी बोलावून संपावर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले; परंतु रविवारी यावर तोगडा निघू शकला नाही. तोडगा निघाला नाही तर सोमवारीही कचरा संकलन ठप्प राहण्याची शक्यता आहे.

.........

तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

बीव्हीजी कंपनीच्या व्यवस्थापनाने ११३ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने झोन क्रमांक ६ ते १० मधील कचरा संकलन दोन दिवसांपासून ठप्प होते. मनपा कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावरील कचरा उचलला जात आहे. मात्र, घराघरातील संकलन बंद आहे. यासंदर्भात बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली आहे. रविवारी चर्चेसाठी बोलावले होते. यावर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीने तोडगा न काढल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त (घनकचरा), मनपा