शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

घरी गणपतीचे जेवण अन् सिलिंडरच नाही !

By admin | Updated: September 23, 2015 06:34 IST

ऐन गणेशोत्सवात निर्माण झालेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्याने हजारो कुटुंब रडकुंडीला आली आहेत. गॅस

नागपूर : ऐन गणेशोत्सवात निर्माण झालेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्याने हजारो कुटुंब रडकुंडीला आली आहेत. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे अनेकांच्या घरात स्टोव्ह पेटवून स्वयंपाक सुरू आहे. गॅसप्रमाणेच रॉकेलही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियमने पुरेसे गॅस सिलिंडर तातडीने उपलब्ध करून न दिल्यास त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक आणि ग्राहक संघटनांनी दिला आहे. ‘बल्क’चा पुरवठा कमीहिंदुस्थान पेट्रोलियमच्या खापरी येथील प्रकल्पात सिलिंडरमध्ये भरणा करण्यात येणारा बल्क मुंबईहून फारच कमी प्रमाणात येत असल्यामुळे घरगुती सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. स्थिती सामान्य होण्यासाठी आणखी दहा दिवस लागेल. प्रत्येकाला सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात कंपनीच्या ३४ एजन्सी असून त्यापैकी नागपूर शहरात २३ एजन्सी असून सहा लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. आॅनलाईन बुकिंग असल्यामुळे सिलिंडरचा काळाबाजार होणे शक्य नाही.अमिताभ धर, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक, हिंदुस्थान पेट्रोलियम.सिलिंडरच्या तुटवड्यावर प्रश्नचिन्हगणेशोत्सवात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलिंडरची टंचाई ही नेहमीचीच बाब असून सणासुदीत टंचाई निर्माण झाल्याने गृहिणी वैतागल्या आहेत. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर १५ ते २० दिवस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गॅस वितरण कार्यालयाचा दूरध्वनी नेहमीच व्यस्त येत असल्याने गृहिणींना कार्यालयात जावे लागते. गॅस सिलिंडरच्या गाड्या वेळेवर येत नसल्याचे वितरण कार्यालयाकडून ग्राहकांना सांगितले जाते. ऐन सणासुदीतच गॅसचा तुटवडा कसा निर्माण होतो, असा गृहिणींचा सवाल आहे.घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापरघरगुती सिलिंडरचा व्यावसायिक कामांसाठी वापर होत असून वितरकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे आणि अ.भा. ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी यांनी लोकमतशी बोलताना केला. सबसिडीवर मिळणाऱ्या घरगुती सिलिंडरचा वापर अजूनही व्यावसायिक वापरासाठी तसेच चारचाकी वाहनांमध्येसुद्धा सर्रास होत असल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून अधिकारी सुस्त आहेत. एकीकडे गॅस वितरकांकडून निर्माण केलेली सिलिंडरची कृत्रिम टंचाई तर दुसरीकडे केंद्र शासनाने ग्राहकांवर लादलेली डीबीटीएल स्कीम या दुहेरी कात्रीत सापडलेल्या ग्राहकाला न्याय देण्याची गरज आहे.