शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयावर आरोप करणारे गंगवानी मानसिक आजारी : हायकोर्टात अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 20:02 IST

कोणताही ठोस आधार नसताना न्यायालयावर चिखलफेक करणारे सेल्समॅन ब्रिजलाल वासुमल गंगवानी (५५) हे ‘पॅरानॉईड पर्सनालिटी डिसॉर्डर’ग्रस्त असल्याचा अहवाल प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने मानसिक आरोग्य कायद्याच्या कलम १०० मधील तरतूद लक्षात घेता गंगवानी यांना २४ तासात संरक्षणामध्ये घेऊन त्यांच्यावर मनोरुग्णालयात उपचार करण्याचा आदेश जरीपटका पोलिसांना दिला.

ठळक मुद्देरुग्णालयात उपचार करण्याचा आदेश

  लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : कोणताही ठोस आधार नसताना न्यायालयावर चिखलफेक करणारे सेल्समॅन ब्रिजलाल वासुमल गंगवानी (५५) हे ‘पॅरानॉईड पर्सनालिटी डिसॉर्डर’ग्रस्त असल्याचा अहवाल प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने मानसिक आरोग्य कायद्याच्या कलम १०० मधील तरतूद लक्षात घेता गंगवानी यांना २४ तासात संरक्षणामध्ये घेऊन त्यांच्यावर मनोरुग्णालयात उपचार करण्याचा आदेश जरीपटका पोलिसांना दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा सुनावण्याची तरतूद कायद्यात आहे. परंतु, दोषी व्यक्ती मनोरुग्ण असल्यास त्याला शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने गंगवानी यांची मानसिक तपासणी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, गंगवानी यांची तपासणी करून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी मानसिक आरोग्य कायद्याच्या कलम १०० मधील तरतुदीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्या आधारावर न्यायालयाने वरील आदेश देऊन प्रकरणावर सहा आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.न्यायालयात गंगवानी यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना प्रकरण प्रलंबित आहे. गंगवानी यांच्याविरुद्धचे हे दुसरे अवमानना प्रकरण होय. यापूर्वी त्यांनी २००७ मध्ये न्यायालयाचा अवमान केला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने भविष्यात चांगले वर्तन ठेवण्याची समज देऊन त्यांना क्षमा केली होती. परंतु, गंगवानी यांनी स्वत:मध्ये सुधारणा केली नाही. गंगवानी व त्यांच्या भावामधील एक वाद दिवाणी न्यायालयात प्रलंबित होता. दरम्यान, गंगवानी यांनी दिवाणी न्यायालयावर गंभीर आरोप केले. वादाचा निकाल भावाच्या बाजूने गेल्यानंतर गंगवानी यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. अपील प्रलंबित असताना त्यांनी जिल्हा न्यायालयावरही आरोप केले. त्यामुळे तत्कालीन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. डोंगरे यांनी गंगवानी यांच्याविरुद्ध अवमानना कारवाई करण्यासाठी ५ जुलै २०१७ रोजी उच्च न्यायालयात संदर्भ पाठविला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर गंगवानी यांच्याविरुद्ध न्यायालय अवमाननेचे दोषारोप निश्चित करण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmental hospitalमनोरूग्णालय