शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

By admin | Updated: August 3, 2016 02:25 IST

दरोड्याच्या तयारीत निघालेल्या अट्टल गुन्हेगारांच्या एका टोळीला सोनेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री शिताफीने अटक केली.

घातक शस्त्रे जप्त : सोनेगाव पोलिसांची कामगिरी नागपूर : दरोड्याच्या तयारीत निघालेल्या अट्टल गुन्हेगारांच्या एका टोळीला सोनेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे आणि दरोड्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. या गुन्हेगारांकडून अनेक गुन्ह्यांचा तपास लागू शकतो, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांना दिली. सोनेगाव ठाण्यात कार्यरत असलेले हर्षल पाटमासे (वय ३०) यांना सोमवारी रात्री एका खबऱ्याने टीप दिली. अॉटो आणि मोटरसायकलवर जमलेले गुन्हेगार सोनेगाव ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असल्याचे समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी ठाणेदार अशोक बागूल यांना कळविले. त्यानंतर ठाणेदार बागूल, एपीआय पगार, हवालदार सुभाष, नायक मारोती, शिपाई मनीष, संदीप, हिमांशू, हर्षल, सुभाष, राकेश यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून आरोपी पळू लागले. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून आरोपी प्रवीण रामगोपाल मीना (वय २४, रा. कुशीनगर), रवी दिलीप ठाकरे (वय २१, रा. वैशालीनगर), राजेंद्र रामप्रसाद लांजेवार (वय १९, रा. जयहिंद सोसायटी श्यामनगर), राहुल ऊर्फ विशाल श्यामचंद्र रॉय (वय १८, रा.कैकाडीनगर), प्रतीक रमेश गिरी (वय १८, रा. श्यामनगर महाजनचक्कीजवळ मनीषनगर) आणि शंकर कवडुजी कुंभरे (वय २८, रा. बालाजी मंदिरमागे बेसा टी पॉर्इंट) या आरोपींना पकडले. त्यात पुन्हा एका अल्पवयीन साथीदाराचा समावेश आहे. त्यांच्यावर विविध ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून तीन धारदार लोखंडी कोयते, नायलॉनची दोरी, मिरची पावडर, तीन मोबाईल, हॉकी स्टीक तसेच एक अ‍ॅक्टिव्हा असा एकूण ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कामगिरीसाठी सोनेगाव पोलिसांना २० हजारांचा रिवॉर्ड देण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त मासिरकर यांनी सांगितले. यावेळी ठाणेदार अशोक बागूल उपस्थित होते. (प्रतिनिधी)