शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

नाईक तलाव परिसरात गँगवॉर

By admin | Updated: February 25, 2015 02:40 IST

नाईक तलाव परिसरात जुगार अड्ड्यावरून झालेल्या भांडणात एक युवक गंभीर जखमी झाला. त्यामुळे दोन टोळ्यांनी एकमेकांविरोधात हल्लाबोल केला.

नागपूर : नाईक तलाव परिसरात जुगार अड्ड्यावरून झालेल्या भांडणात एक युवक गंभीर जखमी झाला. त्यामुळे दोन टोळ्यांनी एकमेकांविरोधात हल्लाबोल केला. हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. जखमी युवकाचे नाव केशरी सोनवाई आहे. नाईक तलाव परिसरातील बैरागीपुरा येथे तो राहतो. याच परिसरातून जाणाऱ्या कोलकाता रेल्वे लाईनजवळ इंदर नावाचा युवक जुगार अड्डा चालवितो. त्या युवकाशी केशरी सोनवाई याचा वाद सुरू होता. गेल्या चार-पाच महिन्यापासून दोघांमध्ये बरेचदा मारापीटही झाली. मंगळवारी सकाळी १० वाजता इंदरच्या साथीदारांनी मराठे चौकात केशरी सोनवाई याच्यावर फरशाने वार केला. यात त्याच्या डाव्या हाताचा अंगठा कापला गेला. त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच केशरीच्या सहकाऱ्यांनी त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या घटनेचा बदला घेण्यासाठी केशरीच्या सहकाऱ्यांनी इंदरच्या घरावर हल्ला केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. जुगार अड्ड्यामुळे नाईक तलाव येथील नागरिक त्रस्त असल्याचे सूत्राने सांगितले. पोलिसांकडे बरेचदा तक्रार केल्यानंतरही कुठलीही कारवाई होत नाही, त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. (प्रतिनिधी)